इंटरनॅशनल इस्लामिक स्कुलचे बँक खाते गोठवणे चूक - अबु आझमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 December 2016

इंटरनॅशनल इस्लामिक स्कुलचे बँक खाते गोठवणे चूक - अबु आझमी

नागपूर: ८ डिसेंबर
मुस्लीम समाजातील विद्वान डॉ.झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेवर लादण्यात आलेले प्रतिबंध उठवण्याची मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. अबु असीन आझमी यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली. गेली पंचवीस वर्षे डॉ. नाईक हे इस्लामबाबतच्या गैरसमजाचे आपल्या संस्थेमार्फत निराकरण करत असल्याचा दावाही आझमी यांनी केला.

गेली पंचवीस वर्षे डाॅ. नाईक हे इस्लाम धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असून धर्माबाबतचे गैससमज दूर करण्याचे काम ते करत आहेत. मात्र,त्यांच्याबाबत तपासयंत्रणांनी दिलेल्या चुकीच्या माहितीच्या अाधारे त्यांच्या इस्लामिक रिसर्च सेंटरवर केंद्र सरकारने प्रतिबंध लादला आहे. या शिवाय राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने डॉ. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘इस्लामिक इंटरनॅशनल स्कूल’ चे बँक खातेही १८ नोव्हेंबर २०१६ पासून गोठवले आहे. आजमितीला या शाळेत जवळपास १६५ विद्यार्थी शिक्षण घेत असून जवळपास शंभर कर्मचारी या संस्थेत काम करत आहेत. या परिस्थितीत शाळेचे बँक खाते गोठवल्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन थकले असून मुलांना देण्यात येणारे मध्यान्ह भाेजनही बंद झाल्याची बाब मा. अाझमी यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे निदर्शनास आणली. या सर्व प्रकारामुळे मुलांच्या पालकांसह शाळेचे कर्मचारीदेखील त्रस्त आहेत. परिणामी शाळा बंद होण्याची शक्यता असून गोठवलेले बँक खाते लवकर सुरू करून त्यांना पुर्ववत व्यवहार सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी यावेळी अबु आझमी यांनी सभागृहात केली. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.

Post Bottom Ad