मुंबई - स्वीच आयडिया ही मुंबईतील कंपनी आहे. जी उद्योग आणि शैक्षणिक संस्था' यांच्यामधील अंतर कमी करण्यासाठी काम करते. प्रत्येक उद्योगाला कुशल कामगारांची आणि कॅम्पस प्लेसमेंटमध्ये फ्रेशर्सला कामाची गरज आहे. या दोन्हीमध्ये जी दरी आहे त्यांना जोडण्याचे काम स्वीच आयडिया करत आहे. ही कंपनी पदवी पूर्ण होण्याच्या आधी विद्यार्थ्यांना पगारी इंटर्नशिप मिळावी म्हणून मार्गदर्शन करते. तसेच स्वीच आयडिया ‘राष्ट्रीय प्रज्ञाशोध संपादन परीक्षा’ (NTAT) आयोजित करते. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्राथमिक कामाविषयीच्या कौशल्याची परीक्षेद्वारा पडताळणी होते. तसेच कंपनीतील एचआरला कुशल व गुणवत्तापूर्ण कामगार मिळायला सोपे जाते.
ही परीक्षा २०१४ पासून राष्ट्रीय स्तरावर घेतली जात असून पदवीपूर्व आणि पदवीनंतरच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेचा लाभ घेता येतो. यात पास झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम इंटर्नशिपची संधी मिळते. आतापर्यंत १० हजार विद्यार्थ्यांनी उन्हाळी इंटर्नशिपला अर्ज केला आहे. तेही विविध क्षेत्रांत जसे की वेब टेक्नोलॉजी, वेब डेव्हलपमेंट, ग्राफिक डिझाइन, कन्टेन रायटिंग, सेल अंड मार्केटिंग आयओटी प्रोजेक्ट, मशीनचे प्रशिक्षण, क्लाएंट सर्विसिंग प्रोजेक्ट.
ही राष्ट्रीय परीक्षा वर्षातून सर्वसाधारण दोनदा होते, यावेळची परीक्षा आयआयटी मुंबईमध्ये २९ जानेवारी २०१७ रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी विविध विषय आहे जसे टेक्निकल नॉलेज, गणित, तर्क शास्त्र, आचारसंहिता, प्रत्यक्ष कामावरील परिस्थिती. (यामुळे विद्यार्थांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येतो.) एकूण ९० मिनिटांची ही लेखी परीक्षा असते. त्यामध्ये आपणास लेखी एमसीक्यू आणि ओएम आर या पद्धतीने परीक्षा देता येते. परीक्षा केंद्रवर विद्यार्थांच्या ओळखपत्राची पडताळणी केली जाते. या डाटामुळे कंपन्याना विद्यार्थ्यांची माहिती मिळते. विद्यार्थी कोणत्या कॉलेजचा विद्यार्थी आहे तसेच कोणते शिक्षण घेत आहे. विद्यार्थांना या परीक्षेचे डिजिटल प्रमाणपत्र मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे, दिल्ली,हैदराबाद, चेन्नई, आणि बंगलोरमध्ये शेकडो संधी एका प्रमाणपत्र द्वारे उपलब्ध होत आहेत.
विद्यार्थांनी परीक्षेला येताना आपले कॉलेजचे ओळखपत्र, आधारकार्ड, हॉलतिकीट, (बॅच आयडी म्हणून ओळखले जाते) आपला रिझ्युम आणि काळा बॉलपेन आणणे अत्यावश्यक आहे.
परीक्षेची वेबसाईट- https://www.switchidea.com/ntat/
परीक्षेसाठी संपर्क नंबर- +91-9555141142
या संदर्भातील अधिक माहितीसाठी चांदणी देवणी यांच्याशी संपर्क साधावा +91-9819142462 किंवा इमेल करा support@switchidea.com