मुंबई : घाटकोपरच्या छेडा नगर जंक्शन येथे एका कारमधून टिळकनगर पोलिसांनी ५०० रुपयांच्या जुन्या नोटांचे १० कोटी आणि २ हजारच्या नोटांचे १० लाख रुपये ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात ही रक्कम वैद्यनाथ को.आॅप. बँक लिमिटेडची असल्याचे समोर येत आहे.
वैद्यनाथ को.आॅप. बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेतील दोन मॅनेजर आणि दोन अन्य कर्मचारी पुण्याहून ही रक्कम मुंबईतील घाटकोपर शाखेत भरण्यासाठी घेऊन येत होते. त्याच दरम्यान टिळकनगर पोलिसांनी छेडा नगर जंक्शन परिसरात त्यांची गाडी अडवली. त्यांच्या झडतीत त्यांना चलनातून रद्द केलेल्या ५०० रुपयांच्या नोटांचे १० कोटी रुपये आणि २ हजार रुपये नोटांचे १० लाख असे एकूण १० कोटी १० लाख रुपये आढळले. कारमधील कर्मचाऱ्यांच्या चौकशीत ही रक्कम बँकेची असल्याचे सांगितले जात आहे. त्या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शहाजी उमप यांनी दिली.