नागपूर - मुस्लिम आरक्षणा संदर्भात राज्य सरकारने झोपेचे सोंग घेतले आहे, अशी टिका समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबु आझमी यांनी केली आहे. एकवेळ झोपलेल्याला जागे करणे शक्य आहे, मात्र झोपेचे सांेग घेतलेल्यांना कसे जागे करणार असा सवालही त्यांनी केला.गुरूवारी नागपूरच्या विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभेत कुणीही मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर कुणीही बोलत नाही. बुधवारी नागपूरमध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी आरक्षणाच्या मागणीकरीता भव्य मोर्चा काढला होता. त्यावेळी सभागृहाचे सर्व कामकाज बंद करून बहुतांश आमदार या मोर्चात सहभागी होण्यासाठी गेले होते.मोर्चात सहभागी होण्याबाबत आक्षेप नाही, मात्र हाच मोर्चा जर मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी असता तर किती आमदार त्यात सहभागी झाले असते हा प्रश्न आहे. तसेच आपण जेव्हा मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानभवनात चर्चेची मागणी केली तेव्हा कुणीही आपल्या मागणीला पाठिंबा दिला नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.