सफाई कर्मचाऱ्यांना सदनिका उपलब्ध करुन देणार - डॉ. रणजीत पाटील - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 December 2016

सफाई कर्मचाऱ्यांना सदनिका उपलब्ध करुन देणार - डॉ. रणजीत पाटील

नागपूर / मुंबई दि. 17 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील आश्रय योजनेंतर्गत सुमारे 28 हजार सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहतींचा पुनर्विकास करुन सेवा कालावधीत सदनिका उपलब्ध करुन देण्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य भाई गिरकर यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना डॉ. पाटील बोलत होते. 
यावेळी डॉ. पाटील म्हणाले की, सद्य:स्थितीत 39 ठिकाणी असलेल्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा विकास नियंत्रण नियमावलीनुसार कमाल चार चटई क्षेत्र निर्देशांक वापरुन महापालिकेमार्फत पुनर्विकास करावयाचे नियोजित केले आहे. तसेच राज्यातील नगरपालिकेतील / महानगरपालिकेतील ज्या सफाई कामगारांची सेवा 25 वर्षे किंवा त्याहून अधिक झाली आहे अशा सफाई कामगारांना सेवानिवृत्तीनंतर किंवा सफाई कामगारांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास, अशा सफाई कामगारांच्या पात्र वारसांना मालकी तत्वावर 269 चौ.फुट चटई क्षेत्राच्या सदनिका मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी 4 या कमाल चटई क्षेत्र निर्देशांकाच्या मर्यादेत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांपैकी 50 टक्के सदनिका सेवा निवासस्थान म्हणून व उर्वरित 50 टक्के सदनिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेंतर्गत उपलब्ध करुन देण्यास दि. 12 जून, 2015 च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, विद्या चव्हाण यांनी भाग घेतला.

Post Bottom Ad