महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून सन 2017 या वर्षासाठी ज्याचे एकही पुस्तक प्रकाशित झाले नाही अशा नवलेखकांच्या पहिल्या प्रकाशनाला अनुदान देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
नवलेखकांना कविता, नाटक/ एकांकिका, बालवाङमय (64 ते 96 टाईप केलेली पृष्ठे – 80 कविता), कथा (128 ते 144 टाईप केलेली पृष्ठे – 45000 शब्द), नाटक/एकांकिका (64 ते 96 टाईप केलेली पृष्ठे – 28000 शब्द), कादंबरी (128 ते 144 टाईप केलेली पृष्ठे – 45000शब्द), बालवाङमय (64 ते 96 टाईप केलेली पृष्ठे – 28000 शब्द) वैचारिक लेख / ललितलेख/ चरित्र / आत्मकथन /प्रवास वर्णन (128 ते144 टाईप केलेली पृष्ठे – 45000 शब्द) या सहा वाङमय प्रकारातील पहिल्या प्रकाशनासाठी वरील पृष्ठसंख्येच्या मर्यादेतील मुद्रित (टाईप) मजकूराला अनुदान देण्यात येणार आहे.
वर उल्लेखिलेल्या किमान पृष्ठसंख्येपेक्षा कमी पृष्ठसंख्येचे मुद्रित पाठविल्यास सदर मुद्रिताचा या योजनेत विचार केला जाणार नाही. नवलेखकांनी आपले अप्रकाशित साहित्य मुद्रित स्वरुपात (टाईप केलेल्या) पाठवून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने केले आहे. नवलेखकांनी त्यांचे साहित्य दिनांक 1 ते 31 जानेवारी, 2017 या कालावधीत पुढील पत्त्यावर पाठवावे. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाटय मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड,प्रभादेवी, मुंबई 400025 दूरध्वनी क्रमांक 022- 24325931.
या योजनेसाठीचे माहितीपत्रक, विहित नमुन्यातील अर्ज आणि इतर तपशील मंडळाच्या http://msblc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांनी परिपत्रकादवारे कळविले आहे.