राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेचा समारोप २९ डिसेंबर २०१६ रोजी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 December 2016

राष्ट्रीय शालेय क्रिकेट स्पर्धेचा समारोप २९ डिसेंबर २०१६ रोजी

मुंबई 28 Dec 2016 : राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचा समारोप २९ डिसेंबर २०१६ रोजी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पारसी जिमखाना,मरिन ड्राईव्ह येथे होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत क्रीडा व युवक कल्याणसेवा संचालनालय,पुणे यांच्या मार्फत दरवर्षी राज्यात विविध खेळांचे आयोजन तालुका,जिल्हा,राज्य व राष्ट्रीय स्तरावर करण्यात येतात. त्याप्रमाणे भारतीय शालेय शिक्षण खेळ महासंघ व आयुक्त क्रीडा व युवक कल्याणसेवा,पुणे यांनी राष्ट्रीय शालेय १७ वर्षाखालील मुले क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मुंबई विभागाकडे दिले होते. या स्पर्धेला संपुर्ण देशातुन २६ राज्यातील ४२० खेळाडु सहभागी झालेले आहेत.

या स्पर्धा २५ डिसेंबर पासुन सुरू झाल्या असुन त्यांचा समारोप २९ डिसेंबर २०१६ रोजी पारसी जिमखाना,मरिन ड्राईव्ह येथे सायंकाळी ४.०० वाजता राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या समारोप कार्यक्रमाला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष व आमदार आशिष शेलार, आमदार राज पुरोहित,खासदार अरविंद सावंत, प्रशासकिय अधिकारी रत्नाकर शेट्टी, बी.सी.सी.आय व मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप वेंगसरकर, संयुक्त सचिव डॉ. पी.व्ही. शेट्टी, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव प्रदिप मिश्रा, एस.जी.एफ.आय, हिरालाल सोनावणे, जिल्हाधिकारी इ. मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचा अंतीम सामना हा पोलीस जिमखाना येथे होणार असुन समारोप समारंभास जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहणेसाठी आयोजकांनी आवाहन केले आहे.

Post Bottom Ad