मुंबई - कांदिवली पूर्वेला हनुमान नगरर, लोखंडवाला, सिंग इस्टेट या परिसरातील नागरी विकासकामांचा झपाटा काँग्रेस नगरसेविका डॉ. अजंता राजपती यादव यांनी सुरू ठेवला आहे. विकासकामांचे उदघाटन व लोकार्पण सोहळा नेत्यांच्या हस्ते पार पडत असल्याने नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.
सिंग इस्टेटमधील लादीकरण, हनुमाननगर येथील शौचालयांचे नूतनीकरण याबरोबरच हनुमान नगर येथील जेतवन बुद्ध विहार मार्गाचा नामकरण सोहळा नुकताच मुंबई अध्यक्ष संजय निरुपम, अशोक सुत्राळे यांच्या उपस्थितीत पार पडला. तर महिंद्र अँण्ड महिंद्र टॅक्टर डिव्हिजन समोरील भले मोठे मैदान उभारण्यात यादव यांचा सिंहाचा वाटा आहे. जनतेच्या मागणीनुसार या उद्यानाला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे असे नाव देण्यात अले असून त्याचा नामकरण सोहळा रविवारी दुपारी मोठय़ा उत्साहात पार पडला. या वेळी मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम, जिल्हाध्यक्ष अशोक सुत्राळे, नगरसेविका डॉ. अजंता यादव, ब्लॉक अध्यक्ष राजपती यादव यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थितीत होते.
कांदिवली पूर्वेतील अनेक उद्यानांचा विकास डॉ. अजंता यादव यांच्या निधीतून झाला असून या उद्यानांचा वापर करणार्या नागरिकांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत. नागरी विकासकामे करण्यात डॉ. यादव आघाडीवर असून प्रजा फाऊंडेशनच्या यादीत त्यांचे नाव अनेकदा झळकले आहे. रस्त्यांची डागडुजी, शौचालयांचे नूतनीकरण, लादीकरण, नाल्यांच्या संरक्षक भिंती, फिरता दवाखाना, वैद्यकीय शिबिरे, वाचनालये याबरोबर उद्यानांना लोकनेते तसेच युग पुरुषांची नावे देऊन डॉ. यादव यांनी जनतेची मने जिंकली आहेत. त्यांचे पती राजपती यादव यांनी जनतेच्या मागण्यांचा पाठपुरावा करत कामे करून घेतल्याने त्यांचे देखील विभागात कौतुक होत आहे. या नगरसेविकेस काँग्रेसचे कार्यकर्ते, संजय पवार, मातंग समाजाचे कांबळे सर यांची साथ मिळाली.