बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पुर्ण ताकदीने लढणार - सचिन अहिर. - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 December 2016

बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पुर्ण ताकदीने लढणार - सचिन अहिर.

४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीरमुंबई 29 Dec 2016 - फेब्रुवारी २०१७ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पक्षाचे मुंबई विभागीय अध्यक्ष सचिन अहिर व मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही यादी जाहीर केली. 
या विषयी बोलताना सचिन अहिर म्हणाले की पक्षाचे मुंबई व जिल्हा पार्लमेंटरी बोर्डाच्या वतीने इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन तसेच संघटन व त्यांच्या कामाचे मुल्यमापन करुन ही यादी तयार करण्यात आली आहे. काल पुणे येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते आ.अजित पवार, मुंबई प्रभारी आ.जयंत पाटील, खा.सुप्रिया सुळे व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत देखील याबाबत चर्चा देखील करण्यात आली होती. त्यानुसार आज पहिल्या टप्प्यातील ४५ उमेदवारांची पहिली यादी आम्ही जाहीर करीत आहोत. या यादी प्रमाणेच पुढील यादीतही तरुण, सुशिक्षित उमेदवार तसेच सर्वसमाजातील घटकांना प्रतिनिधीत्व दिले जाईल. व लवकरच उर्वरित नावाची यादी जाहीर करण्यात येणार असून बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणुक राष्ट्रवादी पुर्ण ताकतीने लढणार असल्याचे यावेळी सचिन अहिर यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादीच्या पहिल्या ४५ उमेदवारांची यादी
अमरनाथ काशिनाथ झा (३), कृष्णाजी भाऊराव राणे (११), अजय देसाई (१२), पूजा कुणाल मनवाचार्य (२२), किरण पुषोत्तम मोरे(२९), रुपाली अजित रावराणे (३७), रंजना सुभाष धनुका (४४), सारिका आॅस्टिन गे्रसेस (४९), सुनिता सुखदेव कारंडे (५७), रझिया उबेर सबरी(६१), मधुसूदन बी. सदडेकर (६८), बबन आर. मदने (८०), राजमणी गोमतीप्रसाद शुक्ला (८२), नेहा सुहास पाटील (९२), प्रमोद आर. गायकवाड (९५), सुरैना नीलेश मल्होत्रा (९८), मीनाक्षी सुरेश पाटील(१०४), नंदकुमार वैती (१०६), भारती धनंजय पिसाळ (१११), मनिषा तुपे (११६), सुशिला मामा मंचेकर (११७), मनिषा रहाटे(११९), चारुचंदन शर्मा(१२०), ज्योती हारुन खान(१२४), राखी हरिश्चंद्र जाधव(१३१), फरिदा शौकत(१३७), परवीन नसीम खान(१३८), राजेंद्र वामन वाघमारे(१३९), शेख नादीया मोहसीन(१४०), साजिद अब्दुल खान (१४१), सारिका संजय कांबळे(१४२), इलासबी पैगंबर मुजावर (१४३), रुपाली सचिन दाते (१४४), सिराजउद्दीन सलाउद्दीन खान (१४५), नीलेश प्रकाश भोसले (१४६), झिन्नत अजिज कुरेशी (१४७), रेखा मधुकर शिरसाट (१४८), विजय चंद्रकांत भोसले (१५४), तृप्ती अमोल मातेले (१५७), विठ्ठल विरकर(१६६), सईदा आरिफ खान(१६८), अब्दुल रशिद मलिक(१७०), जितेंद्र पांडुरंग म्हात्रे(१७८), रुनाल राजन लाड (१९३), दशरथ एस. नितनवरे (१९६).

Post Bottom Ad