बेस्टमध्ये लैंगिक छळवाद तक्रारींबाबत कार्यशाळा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 December 2016

बेस्टमध्ये लैंगिक छळवाद तक्रारींबाबत कार्यशाळा

मुंबई 28 Dec 2016 : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ केला जातो, परंतु समाजाच्या भीतीने किंवा इतर अनेक कारणास्तव महिला त्याबद्दल तक्रार करत आहेत. अशा लैंगिक छळवाद (प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम २0१३च्या कलम क्रमांक १९ (क) मधील तरतुदीनुसार कामाच्या ठिकाणी होणार्‍या लैंगिक छळापासून महिलांना संरक्षण, लैंगिक छळास प्रतिबंध व भरपाई देणे तसेच याबाबतच्या तक्रारींचे निराकरण करणे या संदर्भात बेस्टच्या कुलाबा आगारातील कार्यालयातील सर्व सेवकवर्ग सदस्यांच्या मार्गदर्शनाकरता अक्षरा या संस्थेतर्फे बुधवारी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये स्नेहा खांडेकर, ऊर्मिला साळुंके (अक्षरा) यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी अपर्णा प्रभूणे-पीठासीन अधिकारी, लियाकत काद्री-वरिष्ठ कर्मचारी व्यवस्थापक, उपक्रमाचे अधिकारी व महिला कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

Post Bottom Ad