मुंबई / प्रतिनिधी 30 Nov 2016 –
‘गुंदवली - कापूरबावडी - भांडुप संकुल दरम्यान भूमिगत जलबोगदा’ चे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरक्षा रक्षक कवायत मैदान, भांडूप येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उप महापौर अलका केरकर, महापालिका आयुक्त अजोय मेहता हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हा बोगदा गुंदवली ते कापूरबावडी आणि कापूरबावडी ते भांडूप संकुल अशा दोन टप्प्यांत एकत्रित बांधण्यात आला आहे. गुंदवली ते कापूरबावडी हा पहिला टप्पा ६.८ किलोमीटर लांबीचा असून कापूरबावडी ते भांडूप संकुल हा दुसरा टप्पा ८.३ किलोमीटर लांबीचा आहे. बोगद्याची एकूण लांबी १५.१ किलोमीटर असून जमिनीखाली सुमारे १०० मीटर खोलीवर बांधण्यात आला आहे. बोगद्याची एकूण जलवहन क्षमता ४००० दशलक्ष लीटर प्रतिदिन एवढी असून सदर प्रकल्पांतर्गत एकूण चार बोगदा मुख विहीर असून यापैकी एक गुंदवली येथे, दोन कापूरबावडी येथे, एक भांडूप संकुल येथे आहे. जलबोगद्यामुळे पाण्याची एकूण वहन क्षमता १८०० दशलक्ष लीटर प्रतिदिन एवढी वाढलेली आहे. सध्या अस्तित्त्वात असलेल्या जलवाहिन्या पर्यायी व्यवस्था म्हणून वापरात येणार आहेत. तसेच ह्या जलबोगद्याच्या वहन क्षमतेमध्ये नव्याने कार्यान्वित झालेले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयाच्या स्रोताबरोबर भविष्यात योजिलेल्या गारगाई व पिंजाळ या स्रोतातून उपलब्ध होणारे पाणी वाहून नेण्याची क्षमताही यात समाविष्ट करण्यात आलेली आहे. तानसा धरण ते भांडुप संकुलापर्यंत दोन तानसा मुख्य जलवाहिन्या १०० वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या असून त्यांची झीज झाली असल्याने वारंवार फुटून पाणी वाया जाते. तसेच त्यांचे दुरुस्ती व परिरक्षण करण्याकरीता जास्त खर्च होतो. जलवाहिन्या चर खोदून किंवा जमिनीवरुन टाकणे, दाट शहरीकरण आणि भूसंपादनातील अडचणींमुळे खूप कठीण व समस्यापूर्ण झाले आहे. या समस्येवर कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी पालिकेने गुंदवली ते भांडुप संकुलापर्यंत पाणी नेण्याकरीता या जलबोगदा प्रकल्पाचे नियोजन केले, ज्यामध्ये वरील चार मुख्य जलवाहिन्यांना पर्यायी व्यवस्था देण्यासोबत नुकत्याच कार्यान्वित करण्यात आलेल्या मध्य वैतरणा प्रकल्पापासून मिळणारे पाणी वाहून नेण्यासोबतच भविष्यात येणाऱया गारगाई व पिंजाळ या स्त्रोतांची पाण्याची वहन व्यवस्था अंतर्भूत केलेली आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे २ हजार ८८७ कोटी रुपये इतकी आहे. पैकी पहिल्या टप्प्याकरीता सुमारे १ हजार ३९८ कोटी तर दुसऱया टप्प्याकरीता १ हजार ४८८ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या प्रकल्पाची चाचणी घेणे आवश्यक होते, त्यानुसार दिनांक १ ऑक्टोबर,२०१६ रोजी चाचणीकरीता बोगदा कार्यान्वित करण्यात आला. चाचणी यशस्वीतेनंतर या बोगद्याचे आता लोकार्पण करण्यात येत आहे.