डिजीटल पेमेंटस् करण्यासाठी सर्वंकष मोबाईल ॲप तयार करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

29 December 2016

demo-image

डिजीटल पेमेंटस् करण्यासाठी सर्वंकष मोबाईल ॲप तयार करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Mantralaya_2
मुंबई दि. 28 Dec 2016 - डिजीटल पेमेंटस् करण्यासाठी सर्व बँकांना वापरता येईल असे सर्वंकष मोबाईल ॲपलिकेशन तयार करुन त्यामध्ये जिल्हा सहकारी प्रादेशिक बँका यांचा समावेश करावा यामूळे त्याचा ग्रामीण भागात प्रभावीपणे वापर करता येणे शक्य होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
निती आयोगाच्या अंतर्गत डिजीटल पेमेंटचा दैनदिन जीवनात वापर वाढविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या समितीच्या बैठकीत आज श्री.फडणवीस व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या बैठकीत त्यांनी हे मत व्यक्त केले. या बैठकीमध्ये समितीचे नियंत्रक आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, डिजीटल सल्लागार नंदन निलकेणी आणि इतर तज्ज्ञ व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

येत्या तीन महिन्यांत दहा लाख पीओएस मशीन वितरीत करण्यात येतील. यामूळे कॅशलेस व्यवहार करण्यास चालना मिळेल, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली. सर्व बॅंकांना या माध्यमातून डिजीटल पेमेंट करता यावे यासाठी सर्वंकष मोबाईल ॲप, विकसीत करणे, आधार कार्डचा वापर करुन चलनविरहीत व्यवहार करणे अशा विविध मुद्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली

Post Bottom Ad

Pages