आंबेडकर स्मारकाबाबत धूळफेक सुरूच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 December 2016

आंबेडकर स्मारकाबाबत धूळफेक सुरूच

जमीन ताब्यात नसताना मिलमधील तोडकाम सुरु 
मुंबई / 2 Dec 2016
११ नोव्हेंबर २०१५ रोजी चैत्यभूमी जवळील इंदू मिलमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन केले . मात्र या जमिनीचे राज्य सरकारकडे अद्याप हस्तांतरण झाले नसल्याची माहिती सदर स्मारकासंदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणारे चंद्रकांत भंडारे यांनी दिली. जमीन हस्तांतरित झाली नसल्याचे पत्रच ३० सप्टेंबर २०१६ रोजी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने आपल्याला पाठवल्याचे भंडारे यांनी म्हटले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते इंदु मिलमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकचे भूमिपुजनचा करण्यात आले. तेव्हा ही या जमिनीचे हस्तांतरण पूर्ण झाले नव्हते. बेकायदेशीरपणे हा भूमीपूजनाचा सोहळा आयोजित करून या सरकारने आंबेडकरी अनुयायांची दिशाभूल केली होती. तसेच या भूमीपूजनाला वर्ष होऊन गेले तरी सरकारने स्मारकाच्या बांधकाम संदर्भात कोणत्याही हालचाली सुरू केल्या नाहीत, असा आरोप भंडारे यांनी केला आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात ५ एप्रिल २०१५ एक सामंजस्य करार करण्यात आला होता.

या कराराची पूर्तता राज्य सरकारने अद्याप केली नाही. शिवाय या करारानुसार इंदु मिलच्या जागेची किंमत राज्य सरकारने द्यावी किंवा त्या किमतीची जागा एनटीसीला द्यावी यावर राज्य सरकारने सहमती दर्शवली आहे. केंद्राच्या अपेक्षेप्रमाने राज्य सरकारने दादर इथल्या साडे बारा एकर जागेची किंमत राज्य सरकारने १४१३ कोटी ३८ लाख रुपये निश्चित केली आहे. मात्र या किमतीवरही केंद्र सरकार ने आक्षेप घेतला आहे. या स्मारकात १.३३ चा एफ एस आय वापरणार असल्याचे राज्य सरकारने केंद्राला कळवले आहे. मात्र या ठिकाणी ग्रंथालय, आय टी पार्क, अणि इतर सुविधा करण्यात येणार असल्याने या जागेच्या एफ एस आय मध्ये वाढ होणार असल्याने त्या जागेची किंमत वाढणार आहे. राज्य सरकारने अद्याप या जागेचे योग्य वैल्यूएशन केले नसल्याचा उल्लेख केंद्रीय सचिव अनिल कुमार यांनी केला आहे. याबाबत राज्य सरकारच्या नगर विकास विभागाशी संपर्क केला असता वरिष्ट अधिकारी बोलण्यास तयार नाहीत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीदिनी इंदु मिलमध्ये बाबासाहेबांच्या बहुचर्चित स्मारकचे बांधकाम सुरु व्हावे अशी लाखो आंबेडकरी अनुयायांची इच्छा होती. मात्र या जागेचे अजून हस्तांतरण न झाल्याने इतक्यात बांधकाम होणे शक्य नाही. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये निराशेचे वातावरण आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी तरी या स्मारकाच्या बांधकामसंदर्भात सरकारने पाउल उचलावे, अशी आंबेडकरी अनुयायांची इच्छा आहे.

इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचे स्मारक होणारच - राजकुमार बडोले
दरम्यान, इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचे स्मारक होणारच आहे. त्या संदर्भात कायदेशीर बाबींचा थोडा उशीर लागतोय. पण तिथे काम सुरु करण्यास काहीही हरकत केंद्र सरकारने घेतली नाही. राज्य सरकारच्या निर्देशानुसार MMRD ने शुक्रवार पासून इंदुमधील अनावश्यक बांधकाम पाडण्यास सुरुवात केल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे. राज्य मंत्री मंडळाने बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या अंतिम आराखड्याला मंजुरी दिली असून प्रसिद्ध वास्तूविशारद शशी प्रभू यांनी हा आराखडा बनवला आहे अशी माहिती ही बडोले यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS