‘बेस्ट’ला ई-पर्सचा फायदा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 December 2016

‘बेस्ट’ला ई-पर्सचा फायदा

मुंबई : बेस्टमध्ये सुट्ट्या पैशांवरून प्रवाशी आणि कंडक्टर यांच्यात नेहमीच भांडणे पहायला मिळतात. मोदी सरकारने नोटाबंदी केल्या नंतर बेस्टने तिकिटाचे व्यवहार कॅशलेस करण्यासाठी ई पर्स सेवा सुरु केली यामुळे  सुट्या पैशांवरून दररोज होणारी भांडणे कमी झाली आहेत. बेस्टच्या तिजोरीत नोव्हेंबरपर्यंत २२ दिवसांतच तब्बल सव्वा कोटींची भर पडली आहे.

सुरुवातीलाा ई-पर्स योजनेला प्रवाशांकडून थंड प्रतिसाद मिळत असल्याने, ही सेवा बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, ८ नोव्हेंबरला प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजारच्या नोटांवर बंदी घातली व या सेवेला प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली. तिकीट घेताना सुट्या पैशांवरून अनेक वेळा बेस्टच्या बसमध्ये प्रवासी आणि कंडक्टरमध्ये भांडणे होत असल्याने, अनेकांनी ई-पर्सचा मार्ग स्विकारला आहे. आरएफआयडी कार्डचा वापर या सेवेत होतो. त्यामुळे प्रवाशांना तिकीट घ्यावे लागत नाही. कंडक्टरकडील मशिनच्या मदतीने तिकिटाची रक्कम वळती होते. प्रवाशाच्या कार्डमध्ये कमी रक्कम असली, तरी त्यातून तिकिटांची रक्कम वळती होत असल्याने, गैरसोय टळली आहे. आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमासाठीही ही जमेची बाजू ठरत असून, आॅक्टोबरपासून पावणेदोन कोटी रुपये बेस्टच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

ई-पर्सचा फायदा   
- १ ते ८ आॅक्टोबरपर्यंत दररोज ५०० ते ७०० प्रवाशी ई-पर्सची सुविधा घेत होते.
- ९ नोव्हेंबरपासून ९१७ जणांनी ई-पर्सचा लाभ घेण्यास सुरुवात केली.
- बेस्टच्या दैनंदिन पास पूर्वी दोन ते नऊ हजारापर्यंत विकले जात होते आता पासविक्रीचे प्रमाण ११ हजारापर्यंत पोहोचले आहे.

Post Bottom Ad