मोदींनी मिनी अर्थसंकल्प जाहीर केला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 December 2016

मोदींनी मिनी अर्थसंकल्प जाहीर केला



नवी दिल्ली 31 Dec 2016 - 2016 ला निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केलं. यावेळी मोदींनी नव्या योजनांची यादी जाहीर केली. नोटाबंदी निर्णयाचा उल्लेख करत झालेले फायदे आणि निर्णय घेण्यामागची कारणं मोदींनी सांगितली.
नवीन वर्षात बँकांना सामान्य परिस्थितीत नेण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं मोदींनी सांगितल आहे. 50 दिवसानंतर परिस्थिती सुधारेल असं मोदी बोलले होते. मात्र अप्रत्यक्षरित्या परिस्थिती सुधरायला वेळ लागेल असं मान्य केलं आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात लक्ष देण्याची गरज असल्याचंही मोदी बोलले आहेत.

8 नोव्हेंबरनंतरच्या घटना आपल्याला पुनर्विचार करायला लावतात. जनशक्तीचं सामर्थ्य काय असतं, प्रशासन कशाला म्हणतात दाखवून दिलं. देशवासियांनी जे कष्ट झेललं ते सर्वांसाठी उदाहरण आहे. सत्य आणि चांगल्या कामासाठी जनता आणि सरकारने खांद्याला खांदा लावून लढा दिला असं मोदी बोलले आहेत. तसंच नोटाबंदीमुळे लोकांना त्रास झाला, लोकांनी मला चिठ्ठी लिहून आपला त्रास सांगितला. हे सर्व मला आपलं माणूस म्हणून सांगण्यात आलं असंही मोदी बोलले आहेत. 

देशातील फक्त 24 लाख लोकांनी आपलं उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त असल्याचं मान्य केलं असल्याची धक्कादायक माहिती यावेळी मोदींनी दिली. कायदा कठोरपणे आपलं काम करणार, मात्र इमान इतबारे काम करणा-या लोकांन कशी मदत मिळेल याकडेही लक्ष देणार असल्याचं मोदी बोलले आहेत.

दहशतवादी, नक्षलवादी काळ्या पैशावरच अवलंबून असतात, नोटाबंदी निर्णयामुळे या सगळ्यांना चांगलाच फटका बसला. तंत्रज्ञानाच्या मदतीने भ्रष्टाचार करणा-यांवर बंधन आणण्यास मदत झाली. हे सरकार सज्जनांचं आहे आणि दुर्जनांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी प्रयत्नशील राहील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. भारतातील बँकांमध्ये इतका पैसा एकाच वेळी कधीच आला नव्हता. बँकांनी गरिब, मध्यमवर्गीयांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्यास सुरुवात करावी असं आवाहन मोदींनी यावेळी केलं.

Post Bottom Ad