मुंबई - मतदारांना थेट पैशाचे आमिष दाखवून आचारसंहितेचा भंग करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे विरोधात निवडणुक आयोगाने गुन्हा दाखल करून त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. अबु असीम आझमी यांनी केली आहे. दानवेंनी औरंगाबाद येथे केलेले वक्तव्य म्हणजे भाजपच्या निवडणुक कार्यपद्धतीची झलक असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
सध्या राज्यात काही ठिकाणी नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार सुरू आहे. या प्रचारादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी औरंगाबाद येथील पैठण येथील प्रचारसभेत बोलताना मतदारांना थेट पैशाचे अमिष दाखवले आहे.या सभेत जाहीर व्यासपीठावरून बोलताना दानवे म्हणाले की, " मतदानाच्या एक दिवस आधी अचानक लक्ष्मी घरात येते. लक्ष्मी घरात आली तर तिचे स्वागत करा. ती परत करू नका.' दानवे यांच्या वक्तव्यामुळे निवडणुक आचारसंहितेचा भंग झाला आहे. मतदारांना आमिष दाखवणे हा गुन्हा असून दानवेंच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन राज्याच्या निवडणुक आयुक्तांनी दानवेंच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी मा. आझमी यांनी केली आहे. तसेच अशाच मतदारांना पद्धतीने पैसे वाटप करून भाजपने आतापर्यंत पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या दोन टप्प्यांमध्ये यश मिळवले आहे, असा आरोपही त्यांनी केला. दानवेंची लेखी तक्रार करण्यासाठी आपण लवकरच राज्याचे निवडणुक आयुक्त सहारिया यांची भेट घेणार असल्याचेही आझमी म्हणाले.