मराठा आणि दलित समाजाने एकत्र येवून क्रांतीकारी भूमिका घ्यावी - श्यामदादा गायकवाड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 December 2016

मराठा आणि दलित समाजाने एकत्र येवून क्रांतीकारी भूमिका घ्यावी - श्यामदादा गायकवाड

मुंबई / प्रतिनिधी
केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यापासून दलितांवरील अत्याचारात ५० टक्के वाढ झाली आहे. याकडे दुर्लक्ष करत एट्रोसिटीतला अ माहित नसलेले व महाराष्ट्रातील म माहीत नसलेले राज ठाकरे सारखे लोक एट्रोसिटी रद्द करण्याची मागणी करत आहेत. एट्रोसिटी विरोधात मराठा समाजाच्या युवकांमध्ये शरद पवार सारख्या नेत्यांनी खदखद निर्माण केली आहे. शरद पवार सारखे नेते आग लावण्यात पुढे असल्याने जातीय सलोखा निर्माण व्हावा म्हणून मराठा समाजामधील ही खदखद समजुन घेण्याची गरज आहे. मराठा आणि दलित समाजाला एकमेकाविरोधात लढवले जात आहे. हे षडयंत्र ओळखुन दोन्ही समाजानी एकत्र येवून क्रांतीकारी भूमिका घ्यावी असे आवाहन श्यामदादा गायकवाड यांनी केले.
मुंबईच्या आझाद मैदान येथे आयोजित संविधान सन्मान महामोर्चाला संबोधित करताना गायकवाड बोलत होते. यावेळी बोलताना इतर समाजानी आमचा आवाज दाबुन ठेवला होता यामुळे आमचा दाबला गेलेला आवाज मुख्यमंत्री फड़णवीसापर्यंत पोहचवण्यासाठी बोलका संविधान सन्मान महामोर्चा काढला आहे. हा मोर्चा कुठल्याही मोर्चाची प्रतिकृती किंवा कोणत्याही समाजा विरोधात मोर्चा नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. आज फ्यासिस्ट शक्तींच्या पालख्या वाहणारे लोक एट्रोसिटी रद्द करण्याची मागणी करत आहेत. यामुळे आता अश्या फ्यासिस्ट शक्ति विरोधात लढाई सुरु करण्याची गरज असल्याचे मत श्यामदादा गायकवाड यांनी व्यक्त केले. फ्यासीस्ट शक्ति बरोबर काही दलित नेते गेले आहेत. या लोकांचे रक्तही भगवे झाले असल्याने खाटे मधील ढेकणाप्रमाणे या नेत्याना हाकलून दया असे आवाहन करत याच लोकांनी आजचा मोर्चा रद्द झाल्याची अफवा पसरवल्याने मोर्चाला उपस्थिती कमी असल्याची खंत गायकवाड यांनी व्यक्त केली.

आरएसएस भाजपाला हिंदू राष्ट्र निर्माण करायचे आहे. यांचे हिंदूचे नाव पुढे करून ब्राम्हणी राज्य निर्माण करण्याचे षडयंत्र असल्याने आपल्या पूर्वजांनी ज्या प्रमाणे पेशवाई गाढली त्याच प्रमाणे आजही पेशवाई गाढायची गरज आहे. महाराष्ट्राला पुढे न्यायचे असल्यास फुले शाहू आंबेडकर विचारधाराच पुढे नेऊ शकत असल्याने मुंबईला यापुढे फुले शाहू आंबेडकरी चळवळीची भूमी बनवूया असे गायकवाड यांनी सांगितले. यावेळी एट्रोसिटीला विरोध करणाऱ्या नेत्यांना आणि त्यांच्या पक्षाला यापुढे कधीही निवडून देऊ नका असे आवाहन भाऊ निर्भवने यांनी केले. एट्रोसिटी कायदा आमचे कवच आहे हे कवच काढून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या १५ आमदारांना निवडणुकीमध्ये घरी बसवले. पदवीधर मतदार निवडणुकीमध्येही या लोकांचे डिपॉझिट जप्त करा. फक्त एससी, एसटी, ओबीसी उमेदवार निवडून द्या असे आवाहन श्रावण देवरे यांनी केले.

आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन करत आहेत. मोदींच्या राज्यात म्हैलाणावरील अत्याचारात वाढ झाली आहे यामुळे मोदींनी महाराष्ट्रात यापुढे कोणत्याही जातीमधील महिलेवर अत्याचार होणार नाही याची शाश्वती द्यावी असे आवाहन डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले. दलितांची आणि मराठ्यांची ताकत एकमेकांविरोधात विरोधात वापरण्याचे षडयंत्र सुरु आहे. हे षडयंत्र ओळखून लोकांनी २०१९ च्या निवडणुकीमध्ये याला उत्तर द्यावे असे मुणगेकर म्हणाले. मुंबईही तथागत गौतम बुद्धाची भूमी आहे. या भूमीमधून आगरी कोळ्यांना हकलवून लावण्यासाठी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारले जात आहे. या स्मारकासाठी मोठ्या प्रमाणात भराव टाकला जाणार असल्याने कोळ्यांचा रोजगार बंद करून मुंबई बाहेर हाकलवून लावले जाणार आहे. यापेक्षा या लोकांनी गड किल्ल्यांकडे लक्ष द्यायला हवे. नरेंद्र मोदी आले म्हणून आमच्या लोकांना अटक करून ठेवले आहे. अश्यावेळी उद्धव ठाकरे, राज ठाकरे सारखे कोणतेही नेते मदतीला आले नाहीत. हि भूमी आमची असून किती काहीही केले तरी आम्हाला या भूमीमधून कोणीही हाकलून देऊ शकत नाही असे सांगत आगरी कोळ्यांच्या मदतीला बौद्धांनी यावे असे आवाहन राजाराम पाटील यांनी केले.

Post Bottom Ad