विधीमंडळ परिसरात “ लोकराज्य ” प्रदर्शनाचे उद्घाटन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 December 2016

विधीमंडळ परिसरात “ लोकराज्य ” प्रदर्शनाचे उद्घाटन

नागपूर दि. 05 : राज्य शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य प्रदर्शनाचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. विधीमंडळ परिसरात पार पडलेल्या या उद्घाटन कार्यक्रमाला माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ, शिवाजी मानकर, नागपूर-अमरावती विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी हेमराज बागुल, सहायक संचालक ज.नि.पाटील उपस्थित होते.

विधीमंडळ परिसरात प्रवेश करताच माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांनी लावलेले लोकराज्य प्रदर्शन येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. या प्रदर्शनात केवळ 10-12वर्षातीलच नव्हे तर चक्क 1964 पासूनचे लोकराज्य ठेवले आहेत. हिवाळी अधिवेशनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाने हा उपक्रम राबविला आहे. या प्रदर्शनात 1964 पासून नोव्हेंबर 2016 पर्यंतचे अनेक विशेषांक पाहण्यासाठी ठेवलेले आहेत. यात बालगंधर्व विशेषांक, शाहु महाराज यांच्या राज्यरोहण सोहळा शताब्दीनिमित्त काढलेला विशेषांक, धम्मचक्र प्रवर्तन महोत्सव विशेषांक, ज्ञानेश्वरी सप्तशताब्दी (नोव्हेंबर 1990),सानेगुरुजी, वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख, महात्मा गांधी, स्वातंत्र दिन, विदर्भ विशेषांक (2011) अखिल भारतीय साहित्य संम्मेलन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विशेषांक, निवडणूक, शेती, सिंचन, मुली वाचविण्यासंदर्भातील विशेषांक, शिक्षण, वन, पर्यटन यासह इतरही विषयाला परिपूर्ण वाहिलेले विशेषांक ठेवण्यात आले आहेत.

सुरुवातीच्या काळात लोकराज्य अंक हे कृष्णधवल (ब्लॅक ॲण्ड व्हाईट) मुद्रीत केलेले असायचे. 2006 पासून लोकराज्य मासिक रंगीत स्वरुपात मुद्रीत करुन लोकांच्या हातात पडू लागले आहे. कालानुरुप लोकराज्यमध्ये बदल होत आला आहे. सुरुवातीला केवळ शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी उपयोगात येणारे हे मासिक इतरही एक-एक विषयाला वाहण्यात आले. मांडणी, आशय आणि सजावट यामध्येही हळूहळू बदल झाला. इंग्रजी आणि ऊर्दु या भाषांमधूनही लोकराज्य प्रकाशित होत असून ते सर्व अंक ऑनलाईन उपलब्ध आहेत.

दुर्मिळ अंक
1964 पंडित जवाहरलाल नेहरु, 1971,72,73,75,79,1980 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन विशेषांक, 2001 डॉ. पंजाबराव देशमुख विशेषांक, 1997 ज्ञानेश्वरी सप्त शताब्दी, 1987बालगंधर्व, 1991 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी विशेषांक, 1991 सुधाकरकराव नाईक, मुख्यमंत्र्यांची यशस्वी कार्यकिर्तीचे 100 दिवस, 1996 सावित्रीबाई फुले विशेषांक, 2012 यशवंतराव चव्हाण विशेषांक - यशवंत किर्तीवंत, दुर्मिळ अंक वि.दा.सावरकर, राजर्षी शाहू महाराज, 1972 मराठवाडा विकास विशेषांक, रविद्रनाथ टागोर विशेषांक, आरोग्य संपदा विशेषांक, अहिल्याबाई होळकर, विदर्भ विशेषांक आदिसह अनेक दुर्मिळ विशेषांक या प्रदर्शनीत पहायला मिळतात.

Post Bottom Ad