मुंबई ( प्रतिनिधी ) – पालिकेच्या एफ दक्षिण' विभागातून जमा करण्यात येणाऱ्या कचऱ्याची विभाग स्तरावरच विल्हेवाट लावता यावी, यासाठी या विभागात पालिकेकडून विविध प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामध्ये घरोघर जाऊन कचरा संकलन, कच-याचे विभाग स्तरावर वर्गीकरण करता यावे तसेच कचरा वर्गीकरण केंद्र, उद्यानातील कच-याचे विघटन व्हावे यासाठी गांडूळ खत प्रकल्प व सेंद्रीय खत निर्मिती प्रकल्प यासारखे उपक्रम राबविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. तर ओल्या कचऱ्यापासून गॅस निर्मिती केली जात असल्याची माहिती 'एफ दक्षिण' विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली आहे.
पालिकेच्या एफ दक्षिण विभागामध्ये परळ, लालबाग, करी रोड, शिवडी, कॉटन ग्रीन, काळा चौकी यासारख्या परिसरांचा समावेश आहे. तसेच वाडीया रुग्णालय, टाटा कॅन्सर हॉस्पीटल, महापालिकेचे केईएम रुग्णालय, यासारख्या मोठ्या रुग्णालये देखील याच विभागात आहेत. या विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजांमुळे या भागात उपहारगृहे मोठ्या संख्येने आहेत. या सर्व उपहारगृहांमधून दररोज सरासरी ४ मेट्रीक टन एवढा ओला कचरा महापालिकेद्वारे संकलित केला जात असून सुमोर दीड वर्षे हा प्रकल्प यशस्वीपणे चालविला जात आहे. याच प्रकल्पातून प्रेरणा घेऊन एफ दक्षिण विभागाच्या हद्दीतील शिवडी येथील महापालिकेच्याच क्षयरोग रुग्णालय समूहाच्या परिसरात कच-यापासून गॅस निर्मिती करण्याचा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. तर विभागातील साधारणपणे १२२ उपहारगृहातून ४ मेट्रीक टन एवढ्या प्रमाणातील जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून गॅस निर्मिती प्रकल्पात वापर करण्यात येणार आहे. यापासून दररोज साधारणपणे २०० किलो गॅस निर्मिती होन्याची शक्यता असून यापैकी दररोज सुमारे १०० किलो एवढ्या गॅसचा उपयोग रुग्णालयातील स्वयंपाकघर व उपहारगृहातील शेगड्यांसाठी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तर उर्वरित १०० किलो गॅसपासून वीजनिर्मिती करण्याचे अथवा त्याचा वापर स्मशानभूमीतील दाहिनीसाठी करावयाचा प्रस्ताव विभाग कार्यालयाच्या स्तरावर विचाराधीन असल्याचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी सांगितले