“रुग्णवाहिकांना वाट द्या आपली वाहने डाव्या बाजूला हळू चालवा’’ या मोहिमेचे उदघाटन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 December 2016

“रुग्णवाहिकांना वाट द्या आपली वाहने डाव्या बाजूला हळू चालवा’’ या मोहिमेचे उदघाटन

मुंबई २८ Dec 2016  : “रुग्णवाहिकांना वाट दया आपली वाहने डाव्या बाजूला हळू चालवा’’ या मोहिमेचे उदघाटन वैध मापन शास्त्र विभाग,पेट्रोलपंप असोसिएशन,फामफेडा व राधी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विदयमाने आज नॅशनल एक्स सर्व्हिस को-ऑ. गॅरेज लि. हिंदूस्थान पेट्रोलपंप,१४१ मंत्रालय येथे करण्यात आले.
यावेळी विशेष पोलीस महानिरिक्षक तथा नियंत्रक वैध मापन शास्त्र अमिताभ गुप्ता, मुंबई पेट्रोलपंप असोसिएशनचे अध्यक्ष रवी शिंदे, फामफेडाचे संस्थापक डॉ.रिटा चावला आदी उपस्थित होते. रुग्णांना अती तातडी व गंभीर प्रसंगी रुग्णालयात पोहचविण्यासाठी रुग्णवाहिका रुग्णालयात वेळेत पोहचविणे गरजेचे असते. प्रत्येकाचे जीवन हे मौल्यवान असल्याने रुग्णवाहीकांना मोकळी वाट देण्याच्या चळवळीमध्ये प्रत्येक वाहन चालकाने सहभागी होणे गरजेचे आहे. याकरिता रुग्णवाहिकांना वाट दया, या मोहिमेंअर्तगत पत्रके तसेच पेट्रोलपंपवर पोस्टर्स व बॅनर्स लावण्यात आले.

यावेळी एचपीसीएल,बीपीसीएल,इंडियन ऑईल कंपनीचे पदाधिकारी म्हणाले की, राधी फाऊंडेशनच्या या समाजपयोगी कार्यामध्ये एचपीसीएल,बीपीसीएल,इंडियन ऑईल यांनी पेट्रोलपंपावर “रुग्णवाहिकांना वाट दया “या विषयाचे फलक लावण्यास सहमती दिली आहे.

.या उपक्रमामध्ये सर्वच लोकांना सहभागी होण्यासाठी फेसबूकवर “Give way to Ambulance”या पेजची निर्मिती केली असून ट्विटरव्दारे या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Post Bottom Ad