डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त दादर चैत्यभुमी येथे भारताच्या काना कोपऱ्यातुन लाखो आंबेडकर अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करायला येत असतात. बाबासाहेबांना अभिवादन केल्यावर महापरिनिर्वाण दिना निमित्त चैत्यभुमी, दादर शिवाजी पार्क येथे उभारलेल्या स्टॉल मधून वैचारिक पुस्तके व इतर साहित्य घेवून आपल्या घरी परत जातात. बाबासाहेबांवर असलेल्या श्रद्धेमुले आणि बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारामुले आपली प्रगती होत असल्याची जाणीव या येणाऱ्या प्रत्तेकाला असल्याने ही लोक न विसरता दरवर्षी 6 डिसेंबरला चैत्यभुमीला येत असतात.
6 डिसेंबरला चैत्यभुमीला येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांनी दरवर्षी एक नवा संकल्प करायला हवे. नुसता 6 डिसेंबरला संकल्प करून चालणार नाही तर हा संकल्प पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी लागेल. बाबासाहेबांनी जे जे विचार मांडले आहेत त्याची अंमलबजावणी करायला हवी. बाबासाहेबांच्या विचारांची आपल्या जीवनात अंमलबजावणी तरच बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने अभिवादन केल्याचे समाधान मिळेल. बाबासाहेबांनी शिकायला संघटित आणि संघर्ष करायला सांगितले. आंबेडकरी अनुयायी शिकला, गटा गटात संघटित झाला आणि संघर्ष करत आहे.
एक काळ असा होता कि आंबेडकरी समाजातील किंवा बहुजन समाजातील कोणावर अन्याय अत्याचार झाल्यास हा समाज रस्त्यावर उतरत होता. आंबेडकरी समाजाची ताकद बघून भल्या भल्यांची झोप उडत होती. यानंतर एक काळ असा आला कि आंबेडकरी समाजावर अन्याय अत्याचार झाले. समाजातील अनेकांच्या हत्या झाल्या. परंतू समाज एकत्र नसल्याने म्हणावा तसा न्याय मिळवून देण्यास समाज कमी पडला आहे. आंबेडकरी समाज एकत्र असता तर ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले त्यांना चांगल्या प्रकारे न्याय मिळवून देता आला असता.
सध्या एट्रोसिटी कायदा रद्द करण्याची, या कायद्यात बदल करण्याची भाषा केली आहे. एट्रोसिटी कायदा आंबेकडकरी समाजासाठी महत्वाचा असल्याने हा कायदा रद्द झाल्यास आंपल्यावर आणखी मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होतील याची जाणीव असल्याने आंबेडकरी समाज लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला आहे. आंबेडकरी समाजाला बहुजन आणि मुस्लिम समाजाने साथ दिली आहे. यामुळे सर्वत्र आंबेडकरी, बहुजन आणि मुस्लिम समाज एकत्र आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आंबेडकरी समाजाचे संसदेत, विधानसभेत लोकप्रतिनिधी नसल्याने आपल्याला कोणीही वाली नसल्याची भावना आंबेडकरी जनतेमध्ये असल्याने रस्त्यावर उतरण्याची गरज भासली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरी समाजाला शासनकर्ती जमात बनण्यास सांगितले होते. बाबासाहेबांनी सांगितल्या प्रमाणे जर आज आंबेडकरी समाज शासनकर्ती जमात बनला असता तर आंबेडकरी समाजाला आज एट्रोसिटी कायदा बदल होणार म्हणून भीती बाळगण्याची गरज नव्हती. कायदा बनवल्या जाणाऱ्या संसद आणि विधानसभेत आपले प्रतिनिधी निवडून ना दिल्याने हि भीती निर्माण होणे सहाजिकच आहे. सध्याचे सरकार आंबेडकरी विचारांच्या अगदी विरोधातील सरकार आहे. अश्या परिस्थितीत तर आंबेडकरी जनतेने सतत जागरूक राहायची गरज आहे.
एट्रोसिटी कायदा रद्द करण्याची, कायद्यात बदल करण्याची मागणी केल्याने आंबेडकरी समाज एकत्र आला. निवडणूकीपूर्ती आपली पोळी भाजून घेण्यासाठी आंबेडकरी समाजात फूट पाडणाऱ्या नेत्यांना बाजूला करत समाज एकत्र आला हा समाजाला झालेला मोठा फायदा आहे. आंबेडकरी समाजाचा फक्त आपल्या फायद्यासाठी वापर करणाऱ्या नेत्यांना बाजूला करून जनतेने एकत्र यावे आणि आपले हक्काचे लोकप्रतिनिधी निवडून आणावेत असे आवाहन करणारे लिखाण करत आलो आहे. यामुळे सध्या आंबेडकरी समाज एकत्र येताना बघून आणि आंबेडकरी समाजाने आपले लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
नुकत्याच संपन्न झालेल्या नगरपालिका व नगर परिषदांच्या निवडणुकीत आंबेडकरी समाजाने केलेल्या मतदानामुळे कारंजा ( वाशिम ), मंगळुरपीर, बुलढाणा या तीन ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. कारंजा ( वाशिम ) - 18, बुलढाणा - 2, खामगाव - 1, जळगाव जामोद - 1, शेगाव - 1, तेल्हारा - 1, मुर्तिजापुर - 4, अकोट - 3 असे एकूण 31 नगरसेवक भारिप बहुजन महासंघाचे तर सुरेश माने यांच्या बहुजन सोशालिस्ट रिपब्लिकन पक्षाने 3 नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपा सरकारच्या सोबत असलेल्या रामदास आठवले यांच्या आरपीआय ( ए) ला सत्तेचा फायदा घेता आलेला नाही. आठवले यांचे सत्तेत असुनही फ़क्त 3 नगरसेवक निवडून आले आहेत.
यावरून आंबेडकरी जनतेने भाजपा सरकारच्या सोबत असलेल्या आठवले याना नाकारले आहे असे म्हणायला हरकत नाही. आंबेडकरी समाजाने यापुढेही आपली मते इतर पक्षाला जाणार नाहित याची काळजी घेतली पाहिजे. पैसे, भांडी, कपडे किंवा कोणतीही आमिषे दाखवली तरी या आमिषाला बळी न पड़ता आपल्या हक्काचे लोकप्रतिनिधी निवडून आणायला हवेत. आंबेडकरी जनतेच्या मतांवर अनेक लोक लोकप्रतिनिधी झाले नंतर त्यांनी कधीही समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा न्याय हक्कासाठी प्रयत्न केलेले नाहित याची जाणीव आंबेडकरी समाजाने ठेवायला हवी.
बहुजन मोर्चाच्या माध्यमातून आंबेडकरी समाज एकत्र आला आहे. ही एकी समाजाने यापुढेही कायम ठेवली पाहिजे. नुसत्या एट्रोसिटीच्या विरोधात एकत्र आलो तसेच समाजाच्या प्रत्तेक प्रश्नावर आणि आन्याय अत्याचारा विरोधात एकत्र यायला हवे. समाजातील ही एकी ग्राम पंचायत, नगर परिषद्, जिल्हा परिषद्, नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभेच्या निवडनुकीमध्ये कायम ठेवत आपल्या उमेदवाराला मतदानातुन दाखवून आपला लोकप्रतिनिधी निवडून आणण्याची गरज आहे. तरच खर्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांचे शासन कर्ती जमात बनण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. बाबासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण केले तरच बाबासाहेबाना खरया अर्थाने अभिवादन ठरेल.
अजेयकुमार जाधव
मो. 9969191363