एसटी बस स्थानकांवर स्वस्त औषधाची दुकाने सुरु करणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 December 2016

एसटी बस स्थानकांवर स्वस्त औषधाची दुकाने सुरु करणार

जेनेरिक औषधांच्या विक्रिला परवानगी देणारे देशातील पहिले महामंडळ - परिवहन मंत्री दिवाकर रावते
मुंबई, दि.27 : एसटी बस स्थानकावर स्वस्त औषधांची दुकाने सुरु करणार असून प्रधानमंत्री भारतीय जन-औषधी परियोजनेंतर्गत राज्यातील 597 बस स्थानकांवर स्वस्त औषध दुकाने उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे देशातील पहिले महामंडळ ठरले आहे.

परिवहन विभाग, आरोग्य विभाग आणि बि पी पी आय यांच्यामध्ये एस टी बस स्थानकांवर स्वस्त औषधाची दुकाने सुरु करण्यासंदर्भात सांमजस्य करारावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

यावेळी परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते, सार्वजनीक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री दिपक सावंत तसेच Bereau of Pharma PSUS of India (BPPI)चे संचालक निकुंज बिहारी सारंगी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल, महाराष्‍ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे महाव्यवस्थापक (नियो.व पणन) कॅ.विनोद रत्नपारखी आदी अधिकारी उपस्थित होते.

गरजू रुग्णांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने आपल्या प्रत्येक बस स्थानकावर  स्वस्त औषधे (जेनेरिक औषध दुकान) उपलब्ध करुन देण्याचा  धोरणात्मक निर्णय घेतला असल्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर सांगितले.

यावेळी रावते म्हणाले की, केंद्र शासनाने सर्व सामान्य नागरिकांना कमी दरात स्वस्त औषधांचा पुरवठा करण्याच्या हेतूने जेनेरिक औषधांच्या विक्रिला प्रोत्साहन  देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार जेनेरिक औषधांची देशभरात विक्री सुरु झाली आहे. जेनेरिक औषधे बाजारातील ब्रँडे्ड औषधांपेक्षा साधारणत: 40 टक्के कमी दरात विकली जातात. जेनेरिक औषधे महाराष्ट्रातील सर्वसामान्य गरजू रुग्णांना पोहचविण्यासाठी राज्यातील एस टी बस स्थानके प्रमुख माध्यम बनतील. या उद्देशाने जेनेरिक औषध दुकानांची संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय एस टी महामंडळाने घेतला.

यानुसार महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहकार्याने जेनेरिक औषध दुकाने लवकरच एसटीच्या सर्व प्रमुख बस स्थानकांवर सुरु करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना याचा विषेश फायदा होणार आहे. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेंतर्गत बस स्थानकावर जेनेरिक औषधांच्या विक्रिला परवानगी देणारे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे देशातील पहिले महामंडळ आहे.असेही रावते यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad