मुंबई दि. 3 :
महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या सहयोगाने “डॉ. बाबासाहेब आंबेडकर” या चित्रपटाची निर्मिती केली आहे.चैत्यभूमीवर येणाऱ्या हजारों अनुयायांसाठी 5 तारखेला दुपारी 3 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता या चित्रपटाच्या दोन विशेष खेळांचे शिवाजीपार्क येथे आयोजन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सहयोगाने चित्रपट विकास महामंडळामार्फत या भव्य चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. डॉ.जब्बार पटेल हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथील चैत्यभूमीवर अनुयायी येत असतात या अनुयायांसाठी चैत्यभूमीजवळील शिवाजी पार्क, दादर येथे हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. 5 तारखेला दुपारी 3 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता सर्वांना हा चित्रपट बघता येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटासाठी संशोधन कार्य डॉ. य. दि. फडके यांनी केले आहे. सूनी तारापोरवाला, अरुण साधु, दया पवार यांनी लेखन केले आहे. तर संकलन विजय खोचीकर, छायाचित्र दिग्दर्शक अशोक मेहता, संगीत अमर हलदीपूर, वेशभूषा भानू अथ्थया, रंगभूषा विक्रम गायकवाड, कलादिग्दर्शन नितीन देसाई, ध्वनी प्रमोद पुरंदरे, निर्मिती सलागार श्याम बेनेगल, या चित्रपटात प्रमुख भूमिका मम्मूटी, सोनाली कुलकर्णी यांच्यासह मोहन गोखले, मृणाल कुलकर्णी, जीवन मेरी, राहूल सोलापूरकर यांच्या भूमिका आहेत.
No comments:
Post a Comment