नागपूर 16 Dec 2016 -
सीएसटी रेल्वे स्थानकाचे बांधकाम १८८७ मध्ये पूर्ण झाले. त्यावेळी या रेल्वे स्थानकाला व्हिक्टोरिया टर्मिनस असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर मार्च १९९६ मध्ये व्हिक्टोरिया टर्मिनस हे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस असे नाव ठेवण्यात आले होते. पश्चिम रेल्वेच्या एलफिन्सटन रोड या रेल्वे स्थानकाचे नाव लॉर्ड एलफिन्सटन हे १८५३ ते १८६० च्या काळात गर्व्हनर ऑफ बॉम्बे असल्यामुळे त्या रेल्वे स्थानकाला एलफिन्सटन रोड असे नाव देण्यात आले होते. त्यामुळे हे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षापासून होत होती.
मुंबईतील एलफिन्सटन रोड या रेल्वे स्थानकाचे नाव प्रभादेवी आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस या रेल्वे स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे होणार आहे. रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडलेल्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी मिळाली. कॅबिनेट बैठकीत या प्रस्तावाला मंजूरी दिल्यानंतर शुक्रवारी हा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करण्यात आला. आता हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट केले.