विज्ञानाची गोडी वाढविण्यासाठी विज्ञान संस्थांचा शाळा-महाविद्यालयांशी नियमित संवाद असावा - राज्यपाल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 December 2016

विज्ञानाची गोडी वाढविण्यासाठी विज्ञान संस्थांचा शाळा-महाविद्यालयांशी नियमित संवाद असावा - राज्यपाल

ठाणे दि.17 : आपल्या शाळांमधून उद्याचे वैज्ञानिक आणि संशोधक घडतात ही गोष्ट लक्षात घेऊन राज्यातील विज्ञान-तंत्रज्ञान संस्था, विद्यापीठे यांचा शाळांशी नियमित स्वरूपाचा संवाद असणे गरजेचे आहे. शाळा-महाविद्यालयांतून विज्ञान विषयक कार्यक्रम व्हावेत जेणेकरून विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागेल आणि शिक्षकांनाही अध्यापनाची नवी नवी तंत्रे आत्मसात करता येतील, असे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी आज येथे सांगितले. 
51 व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यपाल बोलत होते. मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. गडकरी रंगायतन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी राज्यपाल म्हणाले की, पाश्चिमात्य देशांमध्ये विज्ञान महोत्सवांची संकल्पना आहे. त्याच धर्तीवर प्रत्येक शाळा आणि विज्ञान संस्थांमध्ये असे महोत्सव दर वर्षी व्हावेत आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत समाजासाठी असलेली संशोधने आणि शोध यांची माहिती दिली जावी. उच्च शिक्षण घेतांना विज्ञान विषयाकडे खूपच कमी हुशार विद्यार्थी वळताना दिसतात त्याविषयी चिंता व्यक्त करून राज्यपाल म्हणाले की, सध्याच्या शिक्षण पद्धतीत केवळ परीक्षा आणि निकाल यावरच अनावश्यक भर दिला जातो, हे चित्र बदलून नाविन्यपूर्ण आणि सर्जनशीलतेला संधी देणारे शिक्षण मिळायला हवे.

Post Bottom Ad