प्रकाश बाळ सामाजिक बांधलिकी जपणारे पत्रकार - प्रकाश आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 December 2016

प्रकाश बाळ सामाजिक बांधलिकी जपणारे पत्रकार - प्रकाश आंबेडकर

मुंबई 30 Nov 2016  : सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारिता करणारी एक पिढी महाराष्ट्राने पाहिली आहे आणि प्रकाश बाळ जोशी हे त्या पिढीतील पत्रकार असून त्यांच्या साहित्यातही पददलित समाजातील घटकांचे सर्मपक प्रतिबिंब पडलेले दिसते, असे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी येथे सांगितले.
भाष्य प्रकाशनाने प्रकाश बाळ जोशी यांच्या कथा या पुस्तकाला राज्य शासनाचा दिवाकर कृष्ण साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल गुरुवारी त्यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी आंबेडकर बोलत होते. या निमित्ताने त्यांच्या हस्ते मुलुंडच्या निमकर सोसायटी येथील रस्त्याचे कर्मवीर दादासाहेब संभाजी गायकवाड मार्ग, असे नामकरण करण्यात आले. या वेळी बाबासाहेब आंबेडकरांबरोबर काम केलेल्या संभाजी गायकवाड यांच्या कामाचा परिचय करून देणार्‍या 'बिल्डिंग द आंबेडकर रिव्होल्युशन अँड संभाजी तुकाराम गायकवाड' या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचेही प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

या वेळी ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी प्रकाश बाळ जोशी यांच्या कथा या वेगळ्या वाटेने जाणार्‍या असून त्यात माणसाच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केलेला जाणवतो, असे नमूद केले. तर एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर आणि दै. 'पुण्य नगरी'च्या मुख्य संपादक राही भिडे यांनी प्रकाश बाळ जोशी यांनी पत्रकारिता करतानाच स्वत:ची कला जागवत कशी पुढे नेली, यावर विचार मांडले. या समारंभाला नेस इंटरनॅशनल स्कूलचे डॉ. आर. वरदराजन, आमदार तारासिंग, नगरसेविका समिता कांबळे, विनोद कांबळे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन भाष्य प्रकाशनचे महेश भारतीय यांनी केले होते. तर कार्यक्रमाचे संचालन स्वाती भारतीय यांनी केले.

Post Bottom Ad

JPN NEWS