प्रवाशांना त्रास झाल्यावर रेल्वेमंत्री हाताची घडी आणि तोंडावर बोट घेऊन का बसतात - अबु आझमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 December 2016

प्रवाशांना त्रास झाल्यावर रेल्वेमंत्री हाताची घडी आणि तोंडावर बोट घेऊन का बसतात - अबु आझमी

मुंबई 29 Dec 2016 - एरव्ही रेल्वे प्रवाशांच्या फुटकळ ट्वीटसना तातडीने प्रतिसाद देणारे रेल्वेमंत्री सुरेश प्रभु मुंबई लोकल प्रवाशांना त्रास होताच मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट घेऊन का बसतात, असा संतप्त सवाल समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. अबु असीम आझमी यांनी केला आहे. गुरूवारी सकाळी कुर्ला - अंबरनाथ लोकलचे पाच डबे रुळावरून घसरल्यानंतर सकाळी ऐन गर्दीच्या वेळी कल्याण ते कर्जत मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. याबाबत भाष्य करताना आझमी यांनी थेट रेल्वेमंत्र्यांनाच लक्ष्य केले.

देशाचे रेल्वेमंत्री हे एरव्ही मुंबईत आल्यानंतर मुंबईकरांना मोठमोठी स्वप्ने दाखवत असतात. तसेच ट्वीटरवर ही ते खुपच तत्पर असल्याचे दाखवतात. एखाद्या प्रवाशाने आपल्याला रेल्वे डब्यात चादर मिळाली नसल्याचे ट्वीट करताच आपले रेल्वेमंत्री त्वरीत त्यावर ट्वीटरद्वारेच आपल्या अधिकाऱ्यांना आदेश देतात, आणि आपली पाठ आपणच थोपटून घेतात. पण जेव्हा मुंबई लोकलशी संबंधित एखादी समस्या उद्भवते तेव्हा, रेल्वेमंत्री ट्वीटरकडे ढंुकूनही पाहात नाहीत, असा टोला लगावत मा. आझमी म्हणाले की, मेट्रो रेल्वे, बुलेट ट्रेन, रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा अशा चकचकीत घोषणांची खरेतर मुंबई लोकल प्रवाशाला काहीच गरज नाही. किमान लोकल वाहतुक सुरळीत असावी. तसेच गर्दी कमी करण्याच्या उपायांवर रेल्वेमंत्र्यांनी काम करावे, एवढीच मुंबईकरांची माफक अपेक्षा असते. मात्र ती देखील रेल्वेमंत्री पुर्ण करू शकत नसतील, तर उगाचच आपल्या कार्यक्षमतेच्या वायफळ गप्पा प्रभंुनी मारू नयेत, असा सल्लाही मा. आझमी यांनी यावेळी दिला.पुढे ते म्हणाले की, रेल्वेमंत्र्यांप्रमाणेच भाजपचे खासदार किरीट सोमय्याही रेल्वे अर्थसंकल्पाच्या दिवशी सर्व वृत्तवाहिन्यांवरून ज्ञान देत असतात, मात्र जेव्हा अशा पद्धतीने लोकल सेवा ठप्प होते, तेव्हा मात्र सोमय्यासुद्धा आपल्या तोंडातून चकार शब्द काढत नाहीत, असेही आझमी म्हणाले.

Post Bottom Ad