नागपूर 16 Dec 2016 -
मुंबई - नागपूर प्रस्तावित समृद्धी महामार्गावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव प्रवीण परदेशी यांच्यासह इतर सनदी अधिका-यांनी हजारो एकर जमिन आपल्या नातेवाईकांच्या नावावर खरेदी केली असल्याचा आरोप करीत आमदारांनी विधान भवनाच्या दारात निदर्शने केली. ही जमिन सरकारने जप्त करावी, अशी मागणीही या आमदारांनी केली आहे.
मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गाचे काम अत्यंत वेगाने सुरू असून शेतक-यांच्या जमिनी खरेदी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात दबाव आणला जात आहे. तरीही सरकार आणि सनदी अधिकारी हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्याचे कारण आता पुढे आले आहे. या प्रस्तावित मार्गाच्या आजूबाजूला सनदी अधिका-यांनी हजारो एकर जमिन खरेदी करून ठेवली आहे. हा महामार्ग झाला की या जमिनींची किंमत सहा ते सात पटीने वाढणार आहे.
या अधिका-यांनी खरेदी केलेल्या जमिनीचा सातबाराच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी विधानसभेत सादर केला होता. मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी यांनी आपल्या मेहुण्याच्या नावाने जमिन खरेदी केली आहे. तर माजी मुख्य सचिव जे. पी. डांगे यांनी मुलगा रविंद्र याच्या नावाने जमिनी खरेदी केली आहे. ठाण्याचे प्रांताधिकारी सुदाम परदेशी यांनी भाऊ सुभाष याच्या नावावर खरेदी केली आहे.
सुभाष हजारे यांनी भाऊ पुंडलिक आणि भावजयीच्या नावाने जमीन खरेदी व्यवहार केला आहे. ठाणे अतिरिक्त आयुक्त मिलिंद चव्हाण यांनी भाऊ सुनीलच्या नावावर खरेदी व्यवहार केला आहे. तर तत्कालिन अतिरिक्त जिल्हाधिकारी कैलास जाधव यांनी दोन भावांच्या नावे खरेदी केली आहे, असा आरोप आंदोलन करणा-या आमदारांनी केला आहे. या सर्व व्यवहाराची चौकशी करून या सनदी अधिका-यांनी खरेदी केलेले सर्व व्यवहार रद्द करावेत आणि ही जमिन सरकारने जप्त करावी, अशी मागणी या आमदारांनी केली.