मुंबई – दि.१९ डिसेंबर २०१६
नगरपालिका निवडणुकीत मतदारांना पैशांचे आमिष दाखवणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहबे दानवे यांच्यावर कठोर करावाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्य निवडणुक आयोगाकडे केली आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांची मलिक यांनी भेट घेऊन त्यांना याबाबतचे पत्र दिले.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान पैठण येथील सभेत मतदारांनी घरात येणाऱ्या पैशांचे (लक्ष्मीचे) स्वागत करावे असे आवाहन करुन आचारसंहितेचा भंग केला आहे. तसेच मतदारांना दारु वाटण्यासाठी भाजपाचे आमदार पास्कल धानोरा यांनी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांकडे दारुची मागणी केली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन्ही नेत्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नवाब मलिक यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.