पालिकेच्या १७ शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिनचा विद्यार्थिनींना मोफत पुरवठा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 December 2016

पालिकेच्या १७ शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिनचा विद्यार्थिनींना मोफत पुरवठा

मुंबई - २९ डिसेंबर २०१६ - मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला असून सुरुवातीला पालिकेच्या १७ शाळांमध्ये याकरिता सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन बसवण्यात येणार आहे . सदर उपक्रमाचे उदघाटन महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते होणार आहे. अतिरिक्त आयुक्त आय एस कुंदन यांच्या बरोबर सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आणि शिक्षण समिती अध्यक्ष हेमांगी वरळीकर विद्यार्थिनींच्या आरोग्यासंदर्भात झालेल्या चर्चेत सदर निर्णय घेण्यात आला .
पालिका शाळांमधील विद्यार्थिनींच्या आरोग्यासंदर्भात आज अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात झालेल्या चर्चेत वयात येणाऱ्या मुलींमध्ये निकृष्ठ अपुऱ्या आहारामुळे ऍनिमिया आणि इतर आजारांना बळी पडावे लागते . उपरोक्त आजारांचे निदान करण्यासाठी पालिका शाळांमध्ये कॅम्प आयोजित करून शाळकरी मुलींची ऍनिमिया [ ज्यामुळे क्षयरोगाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. ] तसेच ऑबेसिटी [ जंकफूड खाण्याच्या खाण्याच्या सवयी वाढून स्थूलता वाढून स्ट्रोक्स , हायपरलिपिडेमिया अटक ] यासारख्या तपासण्या करण्यात येणार आहे. यासाठी डॉ . नंदिता पालशेतकर अध्यक्षा एम ओ जी एस तसेच मुंबई ऑब्स्टॅटीक आणि गायनेकॉलॉजिकल च्या सदस्य तसेच डॉ . केदार यांचे सहकार्य लाभणार असून याबाबत त्यांच्याकडून व्याख्यानाद्वारे मुलींना मार्गदर्शनही केले जाणार आहे.

Post Bottom Ad