मनसेतर्फे कुर्ल्यात महिलांसाठीच्या अत्याधुनिक व्यायामशाळा आणि योगा केंद्र - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 December 2016

मनसेतर्फे कुर्ल्यात महिलांसाठीच्या अत्याधुनिक व्यायामशाळा आणि योगा केंद्र

मुंबई - कुर्ला विभाग मनसेतर्फे फक्त महिलांसाठी असलेले कुर्ल्यातील अत्याधुनिक व्यायामशाळा आणि योगा केंद्राचे उदघाटन व लोकार्पण शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या व्यायामशाळेला सावित्री बाई फुले महिला व्यायाम शाळा असे नामकरण ही करण्यात आले आहे. 

महिला नेहमीच आपले घर सांभाळताना तसेच नोकरी करणाऱ्या महिला आपले कामकाज करत असताना आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असतात. त्यातल्या त्यात कुर्ला सारख्या मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असलेल्या विभागातील महिलांचे तर आरोग्याकडे दुर्लक्षच होत असते. या महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, व्यायाम तसेच योगा करून निरोगी राहवे या हेतून मनसेतर्फे ही मोफत व्यायामशाळा आणि योगा केंद्र उभारण्यात आले आहे. या व्यायामशाळेत महिलांना व्यायामासाठी आवश्यक सर्व अत्याधुनिक यंत्र सामग्री तसेच महिला प्रशिक्षक देखील नेमण्यात आला आहे. 

Post Bottom Ad