मुंबई : राष्ट्रकुल व आशियाई कुस्ती स्पर्धा पदक विजेते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मल्ल राहुल आवरे, उत्कर्ष काळे, संदीप यादव, विक्रम कुराडे यांच्यासह हिंद केसरीच्या शर्यतीत असलेले नामवंत पैलवान समाधान पाटील, शिवाजी पाटील, माऊली जमदाडे, कौस्तुभ डाफळे, विक्रम जाधव, आप्पा सरगार, राजेंद्र राजमाने आदी ख्यातनाम कुस्तीगीर एक लाख रुपये पुरस्कार असलेली प्रतिष्ठेची मुंबई महापौर चषक कुस्ती स्पर्धा जिंकण्यासाठी मुंबईत दाखल होत आहेत. स्पर्धेसाठी
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई शहर तालीम संघ व मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने होणार्या २९ व्या अखिल भारतीय मुंबई महापौर चषक कुस्ती स्पर्धेचे उदघाटन महापौर स्नेहल आंबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी दुपारी ४ वा. होणार आहे. महिला कुस्ती स्पर्धेत कॉमनवेल्थ कुस्ती स्पर्धेमधील सुवर्णपदक विजेती रेश्मा माने, रौप्यपदक विजेती सोनाली तोडकर, कांस्यपदक विजेती कौसल्या वाघ आदी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या महिला कुस्तीपटू तसेच ऑल इंडिया चॅम्पियन माधुरी मिसाळ, स्वप्नाली आमरे आदींच्या सहभागामुळे रंगत वाढणार आहे. मुंबई महापौर चषक गटात ७४ किलोपेक्षा अधिक, मुंबई महापौर कुमार चषक गट, मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कुस्तीगिरांसाठी र्मयादित, मुंबई महानगरपालिका शाळेतील मुले तसेच मुलींच्या ४0 ते ४५ किलो व ४५ ते ५0 किलो अशा विविध गटांत स्पर्धा होतील. स्पर्धेतील प्रत्येक गटामधील विजेत्यास रोख पुरस्कार व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे.
मुख्य लढतीमधील द्वितीय क्रमांकास रु. ५१,000/- पुरस्कार, तृतीय क्रमांकास रु. ३१,000/- पुरस्कार व चतुर्थ क्रमांकास रु. २१,000/- पुरस्कार असे एकंदर रुपये दोन लाखांचे पुरस्कार आहेत. त्यामुळे वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिरमधील मॅटच्या आखाड्यावर अखिल भारतीय पातळीवरील कुस्त्यांचे जंगी सामने २६ व २७ डिसेंबरदरम्यान रंगणार आहेत. मुंबईकरांना दज्रेदार कुस्त्यांचा आनंद लुटू देण्यासाठी मुंबई शहर तालीम संघाचे कार्याध्यक्ष संजय शेटे, सरचिटणीस प्रकाश तानवडे आदी पदाधिकारी विशेष कार्यरत आहेत.