मुंबई मराठी पत्रकार संघ पत्रकारितेतील विविध पुरस्कार जाहीर - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

30 December 2016

demo-image

मुंबई मराठी पत्रकार संघ पत्रकारितेतील विविध पुरस्कार जाहीर

jpnnews+logo
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी पत्रकार दिनी देण्यात येणारे पत्रकारितेतील विविध पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. शुक्रवार, दि. ६ जानेवारी २०१७ रोजी ५.३० वा. होणाऱ्या पत्रकार दिन समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. या समारंभास प्रमुख पाहुणे व महनीय वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर हे उपस्थित राहणार आहेत. हा समारंभ पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई - ४०० ००१ येथे संपन्न होईल.



या वर्षीच्या पुरस्कारांचे मानकरी पुढीलप्रमाणे 
स्वाती लोखंडे (आयबीएन लोकमत)
बृहन्मुंबईतील नागरी समस्यांवरील गेल्या वर्षभरातील वर्तमानपत्रातून अथवा वृत्तवाहिन्यांमधून उत्कृष्ट वृत्तांत,

स्तंभ व लिखाण यासाठी दिला जाणारा आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार
नंदकुमार पाटील (नाट्य-चित्रपट समीक्षक)
उत्कृष्ट पुस्तकासाठी दिला जाणारा जयहिंद प्रकाशन पुरस्कार
(पुस्तकाचे नाव - नाटक, चित्रपट आणि मी)

गोविंद तुपे (दै. ‘सकाळ’)
कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू, घरदुरुस्ती व दलितोध्दार या विषयावरील लिखाणाबद्दल दिला जाणारा कॉ. तु. कृ. सरमळकर स्मृती पुरस्कार

मुकुंद कुळे (महाराष्ट्र टाइम्स)
ललित लेखनाबद्दल दिला जाणारा विद्याधर गोखले स्मृती पुरस्कार

उमाकांत देशपांडे (दै. लोकसत्ता)
उत्कृष्ट राजकीय बातम्यांबद्दल दिला जाणारा नवसंदेशकार रमेश भोगटे स्मृती पुरस्कार

Post Bottom Ad

Pages