'स्टॉम्प’ च्या तालावर महापालिका शाळेमधील विद्यार्थ्यांचा ताल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 December 2016

'स्टॉम्प’ च्या तालावर महापालिका शाळेमधील विद्यार्थ्यांचा ताल

मुंबई - लंडन ऑलिम्पिक्स आणि ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये आपल्या संगीत सादरीकरणावर साऱयांना ठेका धरायला लावणाऱया ‘स्टॉम्प’ या ब्रिटिश संगीत चमुने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ना. म. जोशी मार्ग महापालिका शाळेमध्ये आज (दिनांक १७ डिसेंबर, २०१६) कला सादर केली. टाकाऊ आणि घरगुती वस्तुंचा खुबीने उपयोग करीत संगीत निर्माण करणाऱया ‘स्टॉम्प’ च्या तालावर महापालिका शालेय विद्यार्थ्यांनीदेखील ताल धरला.
मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिक्षण समितीच्या अध्यक्षा हेमांगी वरळीकर, नगरसेविका किशोरी पेडणेकर आणि अभिनेत्री तथा मॉडेल म्हणून परिचित असलेली श्रेया सरीन यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

नाट्य निर्मिती क्षेत्रांत कार्यरत असलेल्या एजीपी वर्ल्ड या कंपनीच्या सहकार्याने ‘स्टॉम्प’ सध्या भारत दौऱयावर आहे. टाकाऊ वस्तू जसे की झाडू, पाण्याचे ड्रम, पत्र्याचे डबे, बेसीन, तुटलेले पाईप तसेच घरगुती वापराच्या वस्तू आणि साहित्यांचा उपयोग करीत त्यातून संगीत निर्माण करण्यात ‘स्टॉम्प’ चा हातखंडा आहे. या कलेचे प्रशिक्षण महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना देण्याच्या हेतुने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे प्रक्षेपण महापालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरुम उपक्रमाद्वारे देखील करण्यात आले.



‘स्टॉम्प’ च्या चमुने प्रारंभी झाडूच्या सहाय्याने लाकडी व्यासपीठावर संगीत निर्माण करुन साऱयांची वाहवा मिळविली. यानंतर टाळ्या, बूट, लाकडी बाक, तबक,काडीपेटी यांचा मिलाफ करुन ठेका धरणाऱया ‘स्टॉम्प’ ने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करुन टाकले. मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिक्षण समितीच्या अध्यक्षा हेमांगी वरळीकर, अभिनेत्री श्रेया सरीन हेदेखील प्रशिक्षणात सहभागी झाले.

Post Bottom Ad