मुंबई / अजेयकुमार जाधव - 1 Dec 2016
भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (५ आणि ६ डिसेंबर) बेस्ट उपक्रम दादर येथील चैत्यभूमीवर येणार्या जनसमुदायाकरिता विविध सेवा-सुविधा पुरविण्यासाठी सज्ज झाला आहे अशी माहिती बेस्टचे अध्यक्ष मोहन मीठबावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क, दादर चौपाटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राजगृह, आंबेडकर कॉलेज या ठिकाणी 251 अतिरिक्त मार्गप्रकाश दिवे बसवण्यात आले आहेत. वीजपुरवठा अखंडित ठेवण्याकरिता ५00 के.व्ही.ए. क्षमतेचे 2 जनरेटर क्याडल रोड येथे तर रस्त्यावरील दिव्यांसाठी १०० के.व्ही.ए. क्षमतेचे 2 जनरेटर चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क मैदानावर ठेवण्यात आले आहेत. मार्गप्रकाश दिव्यांच्या देखभालीकरिता एरियल लिफ्ट आणि वॉकीटॉकीने सुसज्य अशी ३ पथके शिवाजी पार्क, चैत्यभूमी, संजगिरी लेन येथे तैनात करण्यात आली आहेत. दादर चौपाटी, महापौर निवास आणि ज्ञानेश्वर निवास या ठिकाणी सर्च लाईट बसवण्यात आल्या असल्याचे मीठबावकर यांनी सांगितले.
चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क मैदान परिसरातील महानगरपालिकेने परवानगी दिलेल्या विविध संस्थांच्या मंडपांना तात्पुरती मीटर जोडणी धर्मादाय वीजदराने देण्याकरिता शिवाजी पार्क मैदानात एक खिडकी योजना उभारण्यात आली आहे.५डिसेंबर शनिवारच्या मध्यरात्रीपासून ६ डिसेंबर पर्यंत बसेसची सोय करण्यात आली आहे. शिवाजी पार्क बसचौकी आणि शिवाजी पार्क येथील तंबूमध्ये वाहतूक माहिती केंद्र उघडण्यात आले आहे. ४ ते ६ डिसेंबर तीन दिवस शहर विभागासाठीचा ४० रुपयाचा, उपनगरांसाठीचा ५० रुपयाचा तसेच संपूर्ण शहरासाठी असलेला ७0 रुपयांचा म्याजीक पास दैनंदिन बसपास शिवाजी पार्क बस चौकी तसेच शिवाजी पार्क मैदानावरील बेस्टच्या बूथ मध्ये उपलब्ध करण्यात असणार आहे. हे विशेष तिकीट असल्यामुळे त्याकरिता ओळखपत्राची आवश्यकता नाही अशी माहिती मीठबावकर यांनी सांगितले.
बेस्ट उपक्रमातर्फे भीम अनुयायांकरिता प्रथमोपचार केंद्र व वैद्यकीय मदत केंद्राची देखील उभारणी करण्यात आली आहे. त्याद्वारे १५०० लोकांवर उपचार करण्यात येणार आहेत. १५०० गरजू व्यक्तींची मोफत डोळ्यांची तपासणी करण्यात येणार असून आवश्यक असल्यास १००० लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी बेस्टचे ५० डॉक्टर कर्मचारी अहोरात्र तैनात करण्यात आले आहे. भीम अनुयायाना अल्पोपाहार आणि पाणीवाटप करण्यात येणार आहे. दरवर्षी प्रमाणे बेस्ट उपक्रमातर्फे ६ डिसेंबरसाठी खास १0 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचे मीठबावकार यांनी सांगितले.
अतिरिक्त बसेस महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या जनतेच्या सोयीसाठी 5 डिसेंबरला सायंकाळी 8 नंतर 241,351,354, आणि 16 मर्यादितच्या अतिरिक्त 8 बसेस तसेच 6 डिसेंबरला पहाटे 6 वाजल्यापासून 27,53,63,92 मर्यादित, 165,241,305,354,357,385,251 मर्यादितच्या 40 अतिरिक्त बसेस चालवल्या जाणार आहेत. प्रवाश्यांच्या आवश्यक्तेनुसार जादा बसगाड्या सोडण्याची अवस्था करण्यात आली आहे.