मुंबई 1 Dec 2016 : बृहन्मुंबई महापालिकेच्या पी/दक्षिण विभागांतर्गत येणा-या गोरेगाव पश्चिम परिसरातील पहाडी गावामध्ये 'टोपीवाला महापालिका मार्केट' आहे. या मंडईचा पुनर्विकास प्रस्तावित करण्यात आला असून या ठिकाणी पुनर्विकासांतर्गत १६ मजली इमारत बांधण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरु झाली आहे. या १६ मजल्यांपैकी चौथ्या मजल्यापासून ते सहाव्या मजल्यापर्यंत नाट्यगृह असणार आहे.
महापालिकेच्या मार्केटसह याठिकाणी नाट्यगृह, ग्रंथालय, योगा-केंद्र व व्यायामाशाळा प्रस्तावित करण्यात आले असल्याने मुंबईकर नागरिकांना शॉपिंगचा आनंद घेण्यासोबतच नाट्यकलेच्या माध्यमातून मनोरंजनाची, ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचनाची आणि योगाकेंद्र व व्यायामशाळेच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्तीची सुसंधी व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
नाटकांच्या अनुषंगाने कलाकारांना रंगीत तालीम करणे सोयीचे व्हावे यासाठी या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर तीन छोटे सभागृह बांधण्याचे देखील प्रस्तावित करण्यात आले आहे. नाट्यगृहाचा रंगमंच १८.६० मीटर लांब व १०.१० मीटर रुंदीचा असणार आहे. या नाट्यगृहमध्ये अत्याधुनिक ध्वनी व्यवस्था बसविण्यासाठी आवश्यक ती तजवीज करण्यात येणार असून रंगमंचाच्या समोर खालच्या बाजूला 'ऑर्केस्ट्रा पीट' देखील असणार आहे. टोपीवाला मार्केटमध्ये एकूण १० उद्वाहने (लिफ्ट) असणार असून यापैकी ४ उद्वाहने ही केवळ नाट्यगृहासाठी असणार आहेत.
सध्याच्या टोपीवाला मंडईच्या ४ हजार ४०१ चौ.मी. एवढ्या आकाराच्या भूखंडावर १६ मजली इमारत बांधण्याचे प्रस्तावित आहे. सुमारे २०० गाड्या उभ्या करता येतील अशा वाहनतळाची व्यवस्थाही येथे करण्यात येणार आहे. या मंडईच्या पुनर्विकासासाठी साधारणपणे १०९ कोटींचा खर्च व साधारणपणे ४२ महिन्यांचा कालावधी लागेल असा अंदाज आहे. या कालावधी दरम्यान सध्याच्या मंडईतील गाळेधारकांच्या सोयाच्या दृष्टीने त्यांची पर्यायी व्यवस्था करण्याची तरतूद देखील करण्यात येत आहे.
संपूर्णपणे वातानूकुलित असणा-या या नाट्यगृहामध्ये ८६७ आसने असणार आहेत. यातील काही आसने दिव्यांग व्यक्तिंसाठी राखीव राहतील. या नाट्यगृहामुळे महापालिकेच्या नाट्यगृहांची संख्या वाढण्यासोबतच रसिक मुंबईकरांना अजून एका नाट्यगृहाचा पर्याय खुला होणार आहे. विशेष म्हणजे या १६ मजली इमारतीमध्ये ग्रंथालय, योगा-केंद्र व व्यायामशाळा (Gymnasium) देखील असणार आहे. या मंडईच्या पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया सुरु झाली असून यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर २०१६ आहे.