नोटबंदी विरोधात मुंबईतील रेल्वे स्थानकांवर स्वाक्षरी अभियान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 December 2016

नोटबंदी विरोधात मुंबईतील रेल्वे स्थानकांवर स्वाक्षरी अभियान

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी जो नोटबंदी चा निर्णय घेतला होता. त्याला आता १ महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे. या निर्णयामुळे सर्व लोक त्रस्त आहेत. सामान्य माणसाला रोख पैश्याची कमतरता भासत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की काळे धन वाल्यांवर चाप बसवण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. नकली नोटांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. पण जेवढे काळे धनवाले आहे, त्यांनी आपले धन पांढरे केले आहे. यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने याची जाण मोदी सरकारला करून देण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या वतीने सह्यांची मोहीम अभियान राबविण्यात आले. 
ATM मध्ये २००० रुपयांच्या नकली नोटा सापडत आहेत. या नोटबंदी पूर्वी सरकारने कोणतीही पूर्वतयारी केलेली नव्हती. त्याचेच हे परिणाम आहेत. या निर्णयाविरोधात मुंबई काँग्रेसने अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शन केले. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘‘नोट पे चर्चा’’ सारखे चर्चात्मक आंदोलन केले. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून आज मुंबईतील ६२ लोकल स्थानकांवर नोटबंदीच्या निर्णयाविरोधात स्वाक्षरी अभियान राबवले जात आहे. आमचे सर्व सामान्य नागरिकांना आवाहन आहे की, त्यांनी या स्वाक्षरी अभियानामध्ये सामील व्हावे आणि सरकार विरोधात आपला रोष प्रकट करावा. रागाला दाबून ठेवू नका, व्यक्त करा. दिल्लीतील जे मुजोर सरकार आहे त्यांच्यापर्यंत आपला आवाज जावा यासाठी आपण आपले हस्ताक्षर करावे, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.

सदर प्रसंगी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या सोबत माजी आमदार चरणसिंग सपरा, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, जिल्हाध्यक्ष सुनील नरसाळे, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस विनोद शेखर, नगरसेविका सुषमा साळुंखे, पदाधिकारी पुरण दोशी उपस्थित होते.

Post Bottom Ad