मोकळ्या भुखंडांची चांगली देखभाल करणाऱ्या कंत्राटदारांना पुन्हा भुखंड मिळणार - पालिका आयुक्त अजोय मेहता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 December 2016

मोकळ्या भुखंडांची चांगली देखभाल करणाऱ्या कंत्राटदारांना पुन्हा भुखंड मिळणार - पालिका आयुक्त अजोय मेहता

मुंबई / प्रतिनिधी 30 Nov 2016 - 
मुंबईतील मोकळे भुखंड आता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आधी हे भुखंड पालिकेच्या ताब्यात घेतले जातील. त्यानंतर ज्या ठेकेदारांनी भुखंडाची चांगली देखभाल केली आहे, अश्या ठेकेदारांना देखभाल तत्वावर पुन्हा भुखंड देण्यात येतील अशी माहिती महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी स्थायी समितीत दिली.
मुंबईतील मोकळे भुखंड आणि मोकळी मैदाने, उद्याने दत्तक तत्वावर देण्याबाबतचे नवे धोरण पालिकेने तयार केले आहे. या धोरणानुसार संस्थांना भुखंड देण्याचे निकष ठरविण्यात आले आहेत. या निकषानुसार मुंबईतील 216 मोकळे भुखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यापैकी 36 भुखंड महापालिकेने ताब्यात घेतले आहते. उर्वरित भुखंड ताब्यात घेण्यासाठी संबंधितांना नोटीसा पाठवल्या आहेत. 216 भुखंड ताब्यात घेण्यात आल्यानंतर ज्या ठेकेदाराने चांगल्या प्रकारे भुखडांची देखभाल केली आहे, त्याला पुन्हा मोकळे भुखंड देखभाल तत्वावर दिले जाणार आहेत. तसेच विकसित करण्यात येणाऱ्या भुखंडांच्या व्यवस्थापनात स्थानिक जनतेचा सहभाग ठेवण्यात आला आहे. क्रीडांगणे म्हणून विकसित केलेले मोकळे भुखंड ठराविक कालावधीसाठी विद्यार्थी आणि जनतेला निशुल्क वापरता येणार आहेत, असे आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मोकळ्या भुखंडाबाबतच्या धोरणाला मनसे, काँग्रेसने तीव्र विरोध केला होता. आगामी महापालिका निवडणूका लक्षात घेऊन हे धोरण महागात पडेल हे लक्षात आल्यावर भाजपनेही यूटर्न घेत मोकळ्या भुखंडाच्या धोरणाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. मात्र, स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त अजोय मेहता यांनी कोणत्याही परिस्थितीत मोकळे भुखंड ताब्यात घेण्याचे संकेत दिल्याने भुखंडधारकाचे धाबे दणाणले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS