शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 December 2016

शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तू

मुंबई - बृहन्मुंबई महापालिका शाळांमधील गरीब विदयार्थ्यांना देण्यात येणाऱया २७ शालेय वस्तू पुढील शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी दिल्या जाणार आहेत.विदयार्थ्यांना देण्यात येणाऱया सर्व शालेय वस्तुंच्या प्रस्तावांना स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली आहे.त्यामुळे पुढील पाच महिन्यात खरेदीची सर्व प्रक्रीया पूर्ण करुन एप्रिल -मे महिन्यात हे सर्व शालेय साहित्य महापालिका शाळांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.जेणेकरुन,शाळेच्या पहिल्याच दिवशी या साहित्याचे वाटप विदयार्थ्यांना करता येईल,असे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर (शैलेश) फणसे यांनी स्पष्ट केले आहे.

बृहन्मुंबई महापालिका शाळांमधील विदयार्थ्यांना मोफत शालेय वस्तुंचे वाटप करण्याचा निर्णय महापालिकेच्यावतीने घेण्यात आल्यानंतर प्रत्येक वर्षी मुलांना या साहित्याचे वाटप केले जाते.दरवर्षी मुलांना देण्यात येणाऱया या साहित्य वाटपाला होत असलेल्या विलंबामुळे नाहक सत्ताधारी पक्ष म्हणून आम्हाला आणि प्रशासनाला टिकेचे धनी व्हावे लागते.तसेच साहित्य न मिळाल्यामुळे विदयार्थ्यांचाही हिरमोड होतो.शालेय वस्तुंचे वाटप शाळेच्या पहिल्याच दिवशी करण्यात यावा असा निर्धार शिवसेना-भाजपा युतीने घेतला असून त्याप्रमाणे चालू शैक्षणिक वर्षी पहिल्याच दिवशी मुलांना हे साहित्य देण्यात आले होते.त्यानुसार पुढील शैक्षणिक वर्षांतही यासर्व शालेय वस्तुंचे वाटप शाळेच्या पहिल्याच दिवशी केले जावे म्हणून डिसेंबर महिन्यातच यासर्व साहित्यांच्या प्रस्तावांना मागील स्थायी समितीच्या दोन सभांमध्ये मंजुरी देण्यात आली आहे.

मागील स्थायी समितीच्या सभेत शिशुवर्गासह पहिली ते दहावीच्या विदयार्थ्यांसाठी गणवेश तसेच बूट आणि मोजे यांच्या खरेदीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.त्यानंतर २८ डिसेंबरच्या सभेमध्ये मुलांना देण्यात येणाऱया कंपास पेटी,प्लास्टिक पट़टी,कलर्स,ड्राईग पेन्सिल, ब्रश,रायटिंग पेन्सिल,खोडरबर,प्लॅ॑स्टिक बॉक्स, बॉलपेन बॉक्स अशाप्रकारे १५ शालेय वस्तू, शालेय दप्तर,पाण्याची बाटली, खाऊचा डबा असा दप्तर संच,वह़यांचा संच तसेच रेनकोट व छत्री आदी शालेय वस्तूंच्या खरेदीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष, श्री.यशोधर (शैलेश)फणसे यांनी सांगितले.शिशूवर्ग ते सातवीच्या विदयार्थ्यांना रेनकोट तसेच आठवी ते दहावीच्या विदयार्थ्यांना फोल्डींग छत्र्या देण्यात येणार आहेत.पुढील दोन वर्षांसाठी हया शालेय वस्तुंची खरेदी करण्यात येत आहे.यासर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्यामुळे जानेवारी महिन्यात याचे कार्यादेश देऊन हे सर्व साहित्य एप्रिल -मे महिन्यापर्यंत प्रत्येक शाळांना उपलब्ध करून दिले जाईल.त्यानुसार सर्व शालेय साहित्याचे वाटप विदयार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच केले जाईल,असे त्यांनी सांगितले.

महापालिका शाळांमध्ये नवीन १४३ विज्ञान प्रयोगशाळा
बृहन्मुंबई महापालिका शाळांमधील विदयार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोगांचे प्रात्यक्षिक करता यावे,तसेच वैज्ञानिक उपकरणांची ओळख होणे, वैज्ञानिक साहित्य हाताळण्याचे कौशल्य प्राप्त व्हावे यासाठी महापालिका शाळांमधून शिक्षण घेणाऱया विदयार्थ्यांची विज्ञान विषयक कौशल्ये विकसित होण्याच्या दृष्टीकोनातून विज्ञान प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत.या अनुषंगाने २०१६-१७ करिता महापालिकेच्या १०२ प्राथमिक व ४१ माध्यमिक शाळांमध्ये नवीन विज्ञान प्रयोगशाळा निर्माण करण्यात येत आहेत.त्यासाठी लागणाऱया साहित्यांची खरेदीची प्रक्रीया पूर्ण झाली असून लवकरच हे साहित्य विज्ञान प्रयोगशाळेत उपलब्ध करुन दिले जाणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष, यशोधर (शैलेश) फणसे यांनी दिली आहे.

Post Bottom Ad