नाताळ व नववर्षानिमित्त मद्यविक्रिच्या वेळेत सूट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 December 2016

नाताळ व नववर्षानिमित्त मद्यविक्रिच्या वेळेत सूट

मुंबई - नाताळ व नववर्षानिमित्त दिनांक  24, 25 व 31 डिसेंबर रोजी  राज्यातील विविध मद्य विक्री परवाना निर्धारित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत उघड्या ठेवण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. विदेशी  मद्य किरकोळ विक्रीचे दुकान (एफ एल -2 ) रात्री 10.30  ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी  देण्यात आली आहे. 

एफएलडब्ल्यू -2 व एफएलबीआर-2 हा परवाना असलेली  मद्याची  दुकानं ही  नमूद दिवसांत पहाटे 1 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. सीएल-3 मद्याची दुकान क वर्ग नगरपालिका व जिल्हापरिषद क्षेत्रात रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1.00 वाजेपर्यंत आणि त्या व्यतिरिक्त इतर क्षेत्रात रात्री 12 ते पहाटे 1.00 वजेपर्यंत उघडया ठेवता येतिल. तसेच नमूद दिवशी  ई परवाना असलेले बीअर बार, एफएल -3, एफएल -4, ई-2, नमुना ई(बीअर बार ) पहाटे 5 वाजेपर्यंत खुले राहतील. 

Post Bottom Ad