महानगरपालिका कर्तव्यात अग्रेसर व अद्वितीय - महापौर स्नेहल आंबेकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 December 2016

महानगरपालिका कर्तव्यात अग्रेसर व अद्वितीय - महापौर स्नेहल आंबेकर

मुंबई 26 Dec 2016 - 
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे केवळ प्राथमिक सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे कर्तव्य असते. तथापि, बृहन्मुंबई महानगरपालिका प्राथमिकच नव्हे तर, नागरी दायित्व स्वीकारुन सर्व पद्धतींच्या सेवा-सुविधा देत आहे. महापालिकेची स्वतःची धरणे, वैद्यकीय महाविद्यालये, अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन कक्ष यासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे महापालिका विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे, यामुळे आशिया खंडात बृहन्मुंबई महापालिका ही आपल्या कर्तव्यात अग्रेसर व अद्वितीय असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डॉ. विष्णूप्रसाद नंदराय देसाई महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयातील नव्याने सुरु करण्यात आलेल्या ट्रॉमा अतिदक्षता विभाग व नवजात शिशू अतिदक्षता अतिरिक्त विभागाचे उद्घाटन तसेच डायलेसिस केंद्राचा शुभारंभ मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. 

या कार्यक्रमास आमदार ऍड. अनिल परब, आमदार तृप्ती सावंत, स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे, स्थानिक नगरसेविका पूजा महाडेश्वर, नगरसेवक अनिल त्र्यंबककर, दीपक भूतकर, माजी नगरसेवक सुभाष सावंत, विश्वनाथ महाडेश्वर, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप जाधव, रजनी मेस्त्री तसेच डॉक्टर्स, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

महापौर स्नेहल आंबेकर म्हणाल्या की, डॉ. व्हि. एन. देसाई महापालिका सर्वसाधारण रुग्णालयातील ट्रॉमा अतिदक्षता विभाग, नवजात शिशू अतिदक्षता अतिरिक्त विभाग व डायलेसिस केंद्राची निकड होती. स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेतला. पश्चिम उपनगरात या आरोग्य सेवा-सुविधांची अत्यंत गरज होती. या आरोग्य सेवा-सुविधांमुळे नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याचे महापौर स्नेहल आंबेकर यांनी सांगितले. 

Post Bottom Ad