मुंबई / प्रतिनिधी -
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे ‘एफ/उत्तर' विभागातील माटुंगा येथे १८०० मि.मी. व्यासाची बॉम्बे-II प्रमुख जलवाहिनी व ९०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी यांच्या जल जोडणीचे काम शुक्रवार दिनांक २३ डिसेंबर, २०१६ रोजी सकाळी १० वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत म्हणजेच एकूण १२ तासांसाठी हाती घेण्यात येणार आहे.
यास्तव, एफ/उत्तर विभागातील सायन रुग्णालय, कोरबा मिठागर व प्रवेशद्वार क्रमांक ४, एफ/दक्षिण विभागातील के.ई.एम. रुग्णालय, टाटा रुग्णालय, वाडिया रुग्णालय, एम. जी. एम. रुग्णालय, टी. बी. रुग्णालय, शिवडी (पूर्व), शिवडी (पश्चिम), आंबेवाडी/काळेवाडी, परेल गांव, टी. जे. मार्ग, एम. बी. पी. टी. विभाग, बारादेवी, राम टेकडी, जिजामाता नगर व आर. ए. किडवाई मार्ग, ए विभागातील सेंट जॉर्ज रुग्णालय, नेवल डॉकयार्ड, सी. एस. टी. रेल्वे स्थानक, पी. डिमेलो मार्ग व एम. बी. पी. टी. विभाग, बी विभागातील डोंगरी (सायंकाळचा पाणीपुरवठा), वाडी बंदर व माथाडी कामगार विभाग तसेच ई विभागातील जे. जे. रुग्णालय, माऊंट रोड, माझगांव, डॉकयार्ड, नवा नगर, हाथीबाग, रे रोड, दारुखाना, नूरबाग व एम. बी. पी. टी. विभाग या विभागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील. तरी, नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी अगोदरच्या दिवशीच खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा पुरेसा साठा करावा व पाणी काटकसरीने वापरुन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास योग्य ते सहकार्य करावे.