न्यू हिंद मिल संकुल येथील मैदानावर बांधकाम करण्यास पालिकेला विरोध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 December 2016

न्यू हिंद मिल संकुल येथील मैदानावर बांधकाम करण्यास पालिकेला विरोध

मुंबई (प्रतिनिधी) ; मुंबई महानागापलिकेच्या नवीन रचनेनुसार झालेल्या प्रभाग क्रमांक २०८ मध्ये गिरणी कामगारांसाठी म्हाडाकडून बांधण्यात आलेल्या आणि संक्रमण शिबीर म्हणून २२ मजल्याच्याच्या २४ इमारतींची वसाहत बांधण्यात आली. या वेळी विकासकाकडून 'न्यू हिंद मिल संकुल' या नावाने एक मैदान पालिकेकडे देण्यात आले. मात्र आता पालिकेकडून या मैदानावर चार माजली कला, क्रीडा व सांस्कृतिक भवन बांधून त्यामध्ये समाजकल्याण केंद्र, बालवाडी, व्यामशाळा व इंडोअर गेम सेंटर तसेच भूमिगत वाहनतळ उभारण्याचे ठरविलें जात आहे.

परंतु या परिसरातील रहिवाशांनी याला तीव्र विरोध केला असून स्थानिक नागसेविका समिता नाईक यांच्या नेतृत्वाखाली येथे जनतेचे मतदान घेऊन कौल घेण्यात आला. या मध्ये मैदानाच्या बाजूने ११८९ मते मिळाली तर भूमिगत पार्किंगसह मैदानासाठी ५९ मते मिळाली. यामध्ये या मैदानावर सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी एकही मत मिळाली नाही.

या बाबत समिता नाईक यांनी सांगितले की, आमचा सांस्कृतिक भवनाला विरोध नाही मात्र ते या मैदानावर न बांधता अनंत गणपत पवार लेन येथील पालिकेच्या बॉटलीबॉय कंपाऊंड नावाने जे मोठे मैदान आहे त्या मैदानाची दुर्व्यस्था ही संपुष्ठात येऊन 'न्यू हिंद मिल म्हाडा संकुलचे मैदानही या परिसरातील नागरिकांना मोकळे ठेवता येईल. त्याचबरोबर या मैदानावर होणारे सामाजिक संस्थेचे कार्यक्रम,स्नेह संमेलन, धार्मिक कार्यक्रम इत्यादी करणे शक्य होईल. याचा विचार करून आणि स्थानिक जनतेचा जनमताचा कौल लक्षात घेऊन न्यू हिंद मिल मैदाना ऐवजी पालिकेने बॉटलीबॉय मैदानात विकासकामे करून जनतेला न्याय द्यावा असे समिता नाईक यांनी सांगितले.

Post Bottom Ad