मुंबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पहिल्यांदाच महिला संघ जाहीर केला असून यात भारताच्या स्मृती मानधनाचा समावेश करण्यात आला आहे. या संघात स्थान मिळालेली स्मृती भारताची एकमेव खेळाडू आहे.
14 सप्टेंबर 2015 ते 20 सप्टेंबर 2016 दरम्यानच्या कामगिरीच्या आधारावर आयसीसीतर्फे जगातील सर्वोत्तम खेळाडूंचा संघ निवडला जातो. इतकी वर्षे केवळ पुरुषांचा संघ निवडला जात होता. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसीने या वर्षीपासून महिला संघही जाहीर करण्यात प्रारंभ केला आहे. सांगलीत क्रिकेटची सुरुवात केलेल्या स्मृतीच्या या भरारीने भारतीय महिला क्रिकेटला नक्कीच मोठे प्रोत्साहन मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. डावखुरी फलंदाज असलेल्या स्मृतीने 2 कसोटी, 23 वन-डे आणि 27 टी-20 लढती खेळल्या आहेत. स्थानिक वन-डेमध्ये द्विशतक साजरी करणारी स्मृती भारताची एकमेव फलंदाज आहे. स्मृतीने 2013 साली वन-डे व टी-20 तर 2014 साली कसोटी कारकिर्दीस प्रारंभ केला होता.
आयसीसी महिला संघ :
आयसीसी महिला संघ :
स्मृती मानधना (भारत), सुझी बेट्स (न्यूझीलंड), राचेल प्रिस्ट (न्यूझीलंड), स्टेफनी टेलर (विंडीज), मॅग लेनिंग (ऑस्ट्रेलिया), इल्येस पॅरी (ऑस्ट्रेलिया), हेथर नाईट (इंग्लंड), डियेन्द्रा डॉटिन (विंडीज), सुने लुस (द. आफ्रिका), एल, कास्पेकर (न्यूझीलंड) आणि किम ग्रेथ (आयर्लंड).