मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील सुमारे साडेसात लाख शिक्षकांसाठी लवकरच कॅशलेस हेल्थ आरोग्य योजना सुरु होणार करणार असल्याची घोषणा आज शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधिमंडळात केली. या मागणीसाठी शिक्षक परिषद सातत्याने पाठपुरावा करीत होती
याबाबत शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे व अनिल बोरनारे, यांनी १९ नोव्हेंबर रोजी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून तसेच शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्र्यांसोबत संयुक्त बैठक घेऊन तातडीने हि योजना लागू करण्याची मागणी केली होती. लवकरच मेडिक्लेम कंपन्यांसाठी असलेली नोडल एजन्सी IRDA यांच्या पॅनेलवरील काही विमा कंपन्या याबाबत सादरीकरण करणार असून शिक्षकांना चांगल्या व दर्जेदार सुविधा देणार्या कंपन्यांची निवड राज्य शासन करणार आहे.
९ डिसेंबर रोजी शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे व नरेंद्र धोत्रे यांनी या मागणीसाठी शिक्षणमंत्र्यांशी चर्चा केली होती त्याबाबत अधिवेशन संपल्यावर शिक्षक परिषदेसोबत चर्चा करू असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले होते. शिक्षकांना त्यांच्या घराजवळचे व दर्जेदार सुविधा देणार्या हॉस्पिटल निवडावी यासाठी शिक्षक परिषद पाठपुरावा करणार आहे या निर्णयामुळे राज्यातील जवळपास साडेसात लाख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.