२१, २२ डिसेंबरला कुर्ला व घाटकोपर विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 December 2016

२१, २२ डिसेंबरला कुर्ला व घाटकोपर विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद

मुंबई 17 Dec 2016 - 
पवई व्हेंचुरी, ‘एल’ विभाग येथे १८०० मि.मी. व्यासाच्या कॉर्डमेनच्या झडपेवरील ३०० मि.मी. पर्यायी जलवाहिनीची मोठ्या प्रमाणावर होत असलेली गळती थांबविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. सदर काम दिनांक २१.१२.२०१६ रोजी सकाळी १० वाजता सुरु होऊन ते दिनांक २२ डिसेंबर, २०१६ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येईल. या कालावधीत ‘एल’ विभागातील पश्चिम भाग व ‘एन’ विभागातील पश्चिम भाग येथील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. 

परिणामतः बुधवार, दिनांक २१.१२.२०१६ ते गुरुवार, दिनांक २२ डिसेंबर, २०१६ दरम्यान ‘एल’ विभागातील पश्चिम परिसर व ‘एन’ विभागातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तरी सदर नमूद केलेल्या परिसरातील नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून अगोदरच्या दिवशीच पुरेसा पाणीसाठा करावा आणि काटकसरीने पाण्याचा उपयोग करुन महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

बुधवार, दि.२१.१२.२०१६ सकाळी १० ते गुरुवार, दिनांक २२.१२.२०१६ सकाळी १० पर्यंत एल विभाग (पश्चिम परिसर) –
१) असल्फा येथून होणारे पाणीपुरवठा क्षेत्र – २१.१२.२०१६ – दुपारी १२.०० ते रात्री ११.०० -
साने गुरुजी नगर, अशोक नगर, हिल क्रमांक २, संजय नगर, हिमालया को – ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, जंगलेश्वर महाराज मंदीर मार्ग, मोहिली जलवाहिनी मार्ग, जी. ए. जोडरस्ता भोवतालचा परिसर, लक्ष्मीनारायण नगर, मिलिंद नगर, एन.एस.एस. मार्ग, चांदिवली उड्डाण पूल, जांबोली पाडा, परेरा मार्ग, खैराणी मार्ग, संघर्ष नगर या भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

बुधवार, दि.२१.१२.२०१६ सकाळी १० ते गुरुवार, दिनांक २२.१२.२०१६ सकाळी १० पर्यंत ‘एन’ विभाग – घाटकोपर उच्चपातळी जलाशयावरुन होणारे पाणीपुरवठा क्षेत्र
१) जगदुशा आऊटलेट क्षेत्र (२४ तास) आनंद नगर पार्कसाईट, विक्रोली पार्कसाईट, रामनगर, गोळीबार रस्ता, भीम नगर, कातोडी पाडा
२) असल्फा येथून होणारे पाणीपुरवठा क्षेत्र (दुपारी १२ ते रात्री ११) रामजी नगर, भटवाडी, बर्वे नगर, सिद्धार्थ नगर, चिराग नगर, पार्शी वाडी, काजू टेकडी

Post Bottom Ad