मुंबई दि 30 Nov 2016 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला अधिकाधिक कॅशलेस व्यवहारा करण्याबाबत निर्देश दिले आहे. या निर्देशाची सुरुवात मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. यापुढे दैनंदिन खर्च भागविण्यासाठी स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या बडी ॲप्लिकेशनचा उपयोग ते स्वत: आणि त्यांच्या कार्यालयातील सुमारे 70 अधिकारी आणि कर्मचारी करणार आहेत.
आज मंत्रालयात तावडे यांच्या कार्यालयात स्टेट बँक ऑफ इंडियाचे बडी ॲप्लीकेशन मंत्री विनोद तावडे आणि त्यांच्या आस्थापनेवरील 70 जणांनी डाऊनलोड केले आहे. यावेळी आमदार योगेश टिळेकर, चरण वाघमारे यांच्यासह स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर रावळ उपस्थित होते.
यावेळी तावडे म्हणाले की, यापुढे या ॲप्लिकेशनाचा उपयोग कॅशलेस व्यवहार करण्यासाठी आणि दैनंदिन खर्च करण्यासाठी करण्यात येणार आहे. या ॲप्लीकेशनचा जास्तीत जास्त वापर करणाऱ्या व्यक्तीला दर महिन्याला प्रमाणपत्र देऊन मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या ॲप्लीकेशनचा वापर मोबाईल बिल, लाईट बिल, किराणा सामना बिल भरण्यासाठी उपयोग करता येईल. सध्या मंत्री कार्यालयात या ॲप्लिकेशनबाबत जागरुकता करण्यात आली असून आगामी काळात शालेय शिक्षण,उच्च व तंत्र शिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य आणि अल्पसंख्याक विकास विभागातही संकल्पना राबविण्यात येईल.
आज अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना फी, परीक्षा फी भरण्यात अडचण येत असते. यापुढे मात्र शाळा आणि महाविद्यालयांनी या ॲपच्या माध्यमातून फी स्वीकारावी असा आग्रह करण्यात येईल. तसेच शालेय शिक्षण विभागात सर्वप्रथम याबाबत अंमलबजावणी करण्यात येईल.
काय आहे एसबीआय बडीस्टेट बँक ऑफ इंडिया यांनी काही दिवसांपूर्वी ग्राहकांसाठी एसबीआय बडी हे ॲप आणले आहे. या ॲपचे वैशिष्टय म्हणजे हे ॲप्लीकेशन 13 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. या ॲप्लीकेशनचे वैशिष्टय म्हणजे कॅशलेस व्यवहार यामुळे शक्य होणार असून एसबीआय सह इतर बँकामध्ये खाते असलेल्या ग्राहकांनाही ॲप्लीकेशनचा फायदा घेता येणार आहे. अँडाईड फोनवर हे ॲप्लीकेशन गुगल प्ले स्टोअर वह मोफत आहे.