स्थायी समितीत आरोप - चौकशीचे आदेश
मुंबई / प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेत विविध घोटाले उघड होत असतानाच कचरा वाहतुकीमध्येही घोटाळा झाल्याचा आरोप मनसेचे गटनेते संदिप देशपांडे यांनी स्थायी समिती बैठकीत केला आहे. या घोटाळ्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिले आहेत.
मुंबई महानगरपालिकेत विविध घोटाले उघड होत असतानाच कचरा वाहतुकीमध्येही घोटाळा झाल्याचा आरोप मनसेचे गटनेते संदिप देशपांडे यांनी स्थायी समिती बैठकीत केला आहे. या घोटाळ्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिले आहेत.
मुंबई महानगरपालिकेने कचरा वाहतुकीसाठी 900 कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. यापैकी घाटकोपर येथील 'एन', भांडुप येथील 'एस' व मुलुंड येथील 'टी' विभागासाठी 111 कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. सदर कंत्राट देताना कंत्राटदार एकमेकांना ओळखिचे नसावेत असा नियम आहे. परंतू 43 कंत्राटदार एकमेकांशी संबंधित असून 13 कंत्राटदार काळ्या यादीमधिल असल्याचे देशपांडे म्हणाले.
कंत्राट दिलेल्या गाड्यांना आरटीओचे फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक असते परंतू कंत्राट दिलेल्या सर्व 96 गाड्यांचे फिटनेस सर्टीफिकेट संपले आहे. फिटनेस सर्टीफिकेटसाठी गाड्या आरटीओमध्ये असताना या गाड्या मुलुंड आणि कांजुरच्या डंपिंग ग्राउंडवर कचरा खाली करत असताना नोंद असल्याचे देशपांडे म्हणाले. याबाबत गेले 2 वर्षे मुख्यमंत्री, महापौर, पालिका आयुक्त यांच्याकड़े लेखी तक्रार केली परंतू पुढे काहीही कारवाई झाली नसल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
असाच प्रकार मुंबईमध्ये सर्वत्र झाल्याची शक्यता देशपांडे यांनी वर्तवली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. यावर पालिका अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी घन कचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त बालमवार यांच्या मार्फ़त चौकशी करून अहवाल सादर करू असे सांगितले असता स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी चौकशीचा अहवाल पुढील आठवड्यातील बैठकीत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.