मुंबई ः राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती आणि तालविहार यांच्या संयुक्त विद्ममाने महामानव, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सकाळी 6 वाजता भीमांजली या संकल्पनेच्या माध्यमातून सूर-तालच्या बंदिशीने आदरांजली वाहिली जाणार आहे. मुंबईच्या वडाला येथील डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅंड इकानॉमिक्स च्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सकाळी ठिक 6 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्यानंतर या कार्यक्रमात सहभागी झालेली जनता डॉ. आंबेडकर कॉलेज वडाळा ते चैत्यभूमी असा मार्च करतील.
प्रख्यात बासुरीवादक पंडित हरिप्रसाद चौरासिया, प्रख्यात वीणावादक पंडित विश्वमोहन भट्, प्रख्यात व्हाय़लोनिस्ट पंडित अतुलकुमार उपाध्ये, प्रख्यात पखवाज वादक पंडित भवानी शंकर, ताल-संगीताला अनुरुप स्वरसाज देतील उस्ताद दिलशाद खान आणि प्रख्याद तबला वादक पंडित मुकेश जाधव अशे हे मान्यवर कलावंत सूर-ताल आणि स्वरांच्या मैफलीची जुगलबंदी सादर करतील., अशी माहिती आयोजन समितीचे प्रमुख डॉ. विजय कदम आणि अमन कांबळे यांनी दिली आहे.
मुंबईमध्ये पहिल्यांदा असा हा आदरांजली चा समारोह पार पडतोय. राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित होत आहे. यापूर्वी समितीने बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्समध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये प्रख्यात अभिनेते आमिर खान सहभागी झाले होते, त्याशिवाय नुकतीचं 30 आणि 31 ऑक्टोबर ला कल्याणमध्ये आंतरराष्ट्रीय धम्मपरिषदेचे सुद्धा आयोजन समितीने केले होते. त्याचं श्रृंखलेमध्ये बाबासाहेबांना अनोखी आदरांजली वाहण्यासाठी प्रस्तुत कार्यक्रमाचे आय़ोजन करण्यात आलेले आहे.