नागपूर दि.16 Dec :
डोंबिवलीलगत असलेल्या 27 गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याची कार्यवाही कोकण विभागीय आयुक्तांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तत्काळ पूर्ण करु, असे प्रतिपादन नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज विधान परिषदेत केले.
डोंबिवलीलगत असलेल्या 27 गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याबाबत कार्यवाहीकरण्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य संजय दत्त यांनी केली होती, त्यावेळी डॉ. पाटील बोलत होते.
यावेळी डॉ. पाटील म्हणाले, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून या 27 गावांच्याक्षेत्रामध्ये मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध करुन देऊन नियोजनबध्द विकास करण्याच्या दृष्टीनेसर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. या गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणीया 27 गावांच्या सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने केली आहे. त्यानुषंगाने कल्याण-डोंबिवली शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रातून 27 गावे वगळून या गावांच्या क्षेत्रासाठी नगरपरिषद स्थापितकरण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने प्राथमिक अधिसूचना प्रसिध्द केली आहे.या प्राथमिक अधिसूचनेच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांस अनुसरुन अहवालसादर करण्याबाबत विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांना सूचित करण्यातआले असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले. या चर्चेत सदस्य जगन्नाथ शिंदे , निरंजन डावखरे आदींनी सहभाग घेतला